भारत व पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर : दिवसभरात काय घडले?

भारत व पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर : दिवसभरात काय घडले?

India and Pakistan on the brink of war after Pahalgam Attack What happened during the day: पहलगाम दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 28 जणांना ठार केल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात धोरण आखलंय. त्यात आता देश थेट युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात दिवसभर काय घडले जाणून घेऊयात…

मोठी बातमी! छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, कारण काय?

पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने एका मागे एक कॅबिनेट मीटिंग घेतल्या.त्यामुळे आता पाकिस्तानला भारताकडून कारवाई केली जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आता इस्लामाबाद आणि रावळपिंडीच्या संरक्षणासाठी लढाऊ विमाना तैनात केलेत तसेच पाकिस्तानी हवाई दलाच्या सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार पाक व्यक्त काश्मीरवरही लढाऊ विमान उडवण्यात आले आहेत.

सुरज चव्हाण आणखी अडचणीत, झापूक झुपूक डॉयलॉग चोरल्याचा इन्फ्लुएंन्सरचा दावा

बुधवारी 30 एप्रिलच्या सकाळी पाकिस्तानने पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावाबाबत दावा केला की, आमच्याकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे की, भारत पुढील 24 ते 36 तासात पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो.यावर पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी भारत खोट्या आरोपांच्या आधारे आक्रमण करण्याची तयारी दाखवत आहे. मात्र या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय चौकशी केली जावी.

बदनाम करण्यासाठी विरोधकांचा हा केविलवाणा प्रयत्न…कर्ज घोटाळा प्रकरणावरून विखेंचा विरोधकांवर पलटवार

त्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहेलगाम हल्ल्यानंतर आणखी एक महत्वाची बैठक घेतली.ही बैठक युद्धासाठीच असल्याचा पाकिस्तानकडून दावा करण्यात आला मात्र ही केवळ एक आढावा बैठक होती.याच दरम्यान मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्यावर विश्वास व्यक्त करत पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं.

आर्ट ऑफ लिव्हिंग ठरली वर्षातील सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्था; ग्लोबल सीएसआर आणि ईएसजी पुरस्कारांमध्ये गौरव

दुसरीकडे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पहलगाम हल्ल्यातील जीवित हानीबद्दल शोक व्यक्त केला. मात्र त्याचवेळी त्यांनी भारत या घटनेचा वापर आपला अजेंडा पुढे येण्यासाठी वापरत असल्याचा आरोप केला. भारताला नवी दिल्ली हे अन्वस्त्र संघर्ष केंद्र असेल इशारा देखील दिला.
तर युद्धबंदीचे नियमांचे उल्लंघन करत सलग पाचव्या दिवशी पाकिस्तानी लष्कराने काश्मीर मधील नौशेरा, सुंदरबन आणि अखनुर सेक्टर तसेच बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यातील एलओसी वरील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. त्यावर भारतीय सैन्याकडून देशाच्या सार्वभौमाचे रक्षण करण्यासाठी आम्ही सतर्क असल्याचं आश्वासन देण्यात आलं.

जातनिहाय जनगणना कशी होणार, कोणते प्रश्न विचारले जातात? एका क्लीकवर जाणून घ्या सर्वकाही

दुसरीकडे भारत पाकिस्तान संघर्षामध्ये अमेरिकेने भूमिका घेतली आहे. यावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी सांगितलं की, अमेरिका दोन्ही बाजूशी सक्रिय संवाद साधत आहे. लवकरात लवकर आम्ही पाकिस्तान आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलू. जगातील इतर नेते देखील यामध्ये लक्ष घालणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वा मध्ये याचा सकारात्मक परिणाम होईल. दरम्यान या आल्यानंतर दोन्ही देशांकडून गतिमान कारवाया करण्याचे असल्याने दोन्ही देशांमध्ये नागरिकांनी सीमापार हालचाली वाढल्या आहेत. यामध्ये 24 ते 29 एप्रिल दरम्यान तब्बल 786 पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा बॉर्डरवरून भारतातून बाहेर पडले. तर पाकिस्तानला गेलेले 1376 भारतीय पर्यटक परतले आहेत.

जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक न्यायाचे महाद्वार उघडेल, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेणारी दहशतवादी संघटना द रेजिस्टन्स फ्रंट ही पुन्हा हल्ला करण्याची योजना आखात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.तर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगाममध्ये पोहोचले आहे. यामध्ये त्यांच्यासोबत फॉरेन्सिक तज्ञ देखील आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ त्या हल्ल्यानंतर एका मागे एक बैठका घेत आहे त्यावेळी आज झालेल्या एका बैठकीत जेव्हा सर्व मंत्रिमंडळ बाहेर पडलं. त्यावेळी केवळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या तिघांमध्येच चर्चा झाल्याचे सांगितले सांगितले जात आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची धुरा माजी रॉ प्रमुख आलोक जोशींकडे; पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार?

पंजाब सरकार कडून पाकिस्तान सीमेवर ड्रोन विरोधी यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. ज्याद्वारे पलीकडून शस्त्र आणि अमली पदार्थांची तस्करी केली जाते.दुसरीकडे भारताच्या आक्रमणाच्या भीतीने पाकिस्तानी सियालकोट येथून सैन्याच्या तोफखाना रेजिमेंट हलवले आहेत.तसेच इस्लामाबाद आणि रावळपिंडीच्या संरक्षणासाठी एफ सिक्सटी लढाऊ विमान तैनात करण्यात आलेत. या सर्व घटनाक्रमामध्ये आणखी भर पडली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नऊ मे रोजी नियोजित असलेला रशिया दौरा रद्द करण्यात आला आहे. ते मॉस्को येथे होणाऱ्या विजय दिनाला समारंभाला उपस्थित नसणार आहेत. भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर देखील झाला आहे. बाजारात मोठी घसरण दिसून आली.

तसेच या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने इस्लामाबादला दिल्लीत आणि कार्ला जोडणाऱ्या सहा फ्लाइट्स रद्द केले आहेत. या दरम्यान पाकिस्तानी लष्कराशी झालेला हॉट लाईन वर भारताने पाकिस्तानला कडक इशारा देत शत्रुत्व पूर्ण कारवाया थांबवण्याचा आवाहन केलं. तर पहेलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याचा आदेश सुरक्षा विभागाकडून देण्यात आला.

दरम्यान या सर्वांमध्ये भारतातील भाजप सरकारला पहेलगाम हल्ल्यावरून विरोधकांनी शंभर टक्के पाठिंबा देत कारवाई करण्यास सांगितले आहे. याबाबत राहुल गांधी म्हणाले की पाकिस्तान वरील कारवाई स्पष्ट आणि मजबूत असली पाहिजे. मोदींनी दिरंगाई करू नये.तसेच भारताकडून उचलत असणाऱ्या पावलांमध्ये आता पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत चालवल्या जाणाऱ्या किंवा भाडे तत्वावर घेतलेल्या विमानांसाठी आणि विमान कंपन्यांसाठी लष्करी उड्डानासाठी आपला हवाई क्षेत्र बंद केला आहे. असा सर्व घटना क्रम भारत पाकिस्तान तणावादरम्यान राहिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube