काँग्रेस-भाजप खासदारांची धक्काबुक्की; लोकसभा अध्यक्षांनी घेतला ‘हा’ निर्णय
Congress-BJP Mps Scuffle : संसद भवनाच्या मकर द्वारावर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी खासदारांत गुरुवारी जोरदार राडा झाला. धक्काबुक्कीची घटना घडली. यात भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली असून आता कोणताही खासदार संसद भवनाच्या गेटवर आंदोलन किंवा विरोध प्रदर्शन करू शकणार नाही. कोणत्याही खासदाराला आता अशी परवानगीच दिली जाणार नाही.
संसदेत राडा! भाजप खासदारांनीच धक्का दिल्याचं कॅमेऱ्यात कैद; राहुल गांधींनी A To Z सांगितलं
रिपोर्टनुसार कोणताही खासदार संसदेचे प्रवेशद्वार अडवणार नाही तसेच त्याला येथे आंदोलन करण्याचीही परवानगी देऊ नये असे निर्देश ओम बिर्ला यांनी दिले आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी गुरुवारी वेगवेगळी आंदोलने केली होती. संसद भवनाच्या बाहेर ज्यावेळी दोन्ही आंदोलन कर्त्यांचे गट समोरासमोर आले तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली. यामुळे तणाव वाढला आणि धक्काबुक्कीची घटना घडली. यामध्ये भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी झाले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यामुळेच आपण जखमी झालो असा आरोप खासदार प्रताप सारंगी यांनी माध्यमांशी बोलताना केला होता.
काँग्रेस-भाजपात आरोप प्रत्यारोप
यानंतर भाजप पक्षाकडून प्रतिक्रिया आली. पक्षाचे आणखी एक खासदार मुकेश राजपूत (Mukesh Rajput) देखील या घटनेत जखमी झाले. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, की आम्ही ज्यावेळी संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा भाजपाच्या सदस्यांनी आम्हाला धक्का दिला आणि धमकी सुद्धा दिली.
संसद परिसरात नेमकं काय घडलं?
राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संसदेत संघर्ष पेटला आहे. गुरुवारी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेच्या आवारात भाजप आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये शाब्दिक वाद झाले, त्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले. प्रताप सारंगी यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Video : संसद परिसरात मोठा राडा; राहुल गांधींनी ढकलल्याने भाजप खासदार जखमी
घडलेल्या घटनेबाबत बोलताना प्रताप सारंगी म्हणाले की, राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला त्यावेळी मीदेखील खाली कोसळलो. मी पायऱ्यांजवळ उभा होतो तेव्हा राहुल गांधी आले आणि त्यांनी एका खासदाराला धक्का दिल्याचे सारंगी यांनी म्हटले आहे. फरुखाबादचे खासदार मुकेश राजपूत यांनीही राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.