काय सांगता! कुंभमेळ्यातील स्नानाने शरीरात येते ‘हर्ड इम्युनिटी’; BHU सह तीन संस्थांच्या रिसर्चचा दावा

काय सांगता! कुंभमेळ्यातील स्नानाने शरीरात येते ‘हर्ड इम्युनिटी’; BHU सह तीन संस्थांच्या रिसर्चचा दावा

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात महाकुंभ सुरू झाला आहे. या धार्मिक उत्सवाला 13 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे आणि 26 फेब्रुवारीर्यंत चालणार आहे. याच दरम्यान बीएचयू, एनबीआरआय आणि प्रा. एसएन त्रिपाठी मेमोरियल फाउंडेशनच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासातून एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. कुंभस्नान म्हणजे नैसर्गिक लसीकरणच आहे. कुंभातील सर्व महत्वाचे स्नान करणाऱ्या कल्पवासींमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित होते आणि शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते असा दावा करण्यात आला आहे.

सन 2013 मध्ये आयएमएस बीएचयू, एबीआरआय लखनऊ आणि एसएन त्रिपाठी मेमोरियल फाउंडेशनच्या वैज्ञानिकांच्या रिसर्चमध्ये स्पष्ट झालं होतं की कुंभ स्नान केल्याने व्यक्तीच्या शरीरात हर्ड इम्युनिटी विकसित होते. हीच गोष्ट 2019 मधील अर्ध कुंब पर्वातही दिसली होती. आताच्या महाकुंभातही वैज्ञानिक पथके सातत्याने कल्पावासी आणि येथे येणाऱ्या भाविकांवर रिसर्च करत आहे. कुंभातील स्नान एक प्रकारे नैसर्गिक लसीकरणाचं काम करतं असे या अभ्यासातून अधिक पक्के झाले आहे.

आयआयटीन बाबा अभय सिंह महाकुंभ सोडून अज्ञातस्थळी रवाना? माध्यमांसमोर येत सांगितलं सत्य 

इम्युनोग्लोब्युलिनमध्ये वाढीची प्रवृत्ती

अभ्यासात सहभागी असलेले डॉ. वाचस्पती त्रिपाठी यांनी सांगितले की 2013 मध्ये आम्ही प्रयागराजमध्ये कुंभातील प्रत्येक स्नानावर संगम स्थळ आणि आसपासच्या परिसरातून 765 नमुने गोळा केले होते. तसेच कल्पवास आणि स्नान करण्यासाठी गेलेल्या एक हजार लोकांच्या आरोग्याचे परीक्षण केले होते. त्यांच्या रक्ताचीही तपासणी केली होती. यामध्ये किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, सीबीएस आणि टायफाइड यांसारख्या तपासण्या होत्या. तपासणीसाठी घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात विविध प्रकारचे सूक्ष्म जीवाणू मिळून आले. तसेच इम्युनोग्लोब्युलिन वाढण्याची प्रवृत्ती दिसून आली.

डॉ. त्रिपाठी पुढे म्हणाले, कल्पवासी व्यक्ती किंवा येथे स्नान करणाऱ्या एकाही व्यक्तीला कोणताही व्हायरल आजार झालेला नाही. अभ्यासातून असेही समोर आले की कोट्यावधी लोकांनी स्नान केल्याने नॅचरल अॅक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी सिस्टिम विकसित झाली. यामुळे स्नान करणाऱ्या व्यक्तीत रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत झाली. स्नान करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात अँटीजेन तयार झाल्याने हर्ड इम्युनिटी डेवलप झाली. कोट्यावधी लोकांनी स्नान केल्याने त्या पाण्याची सायंटिफिक व्हॅल्यू वाढते. परंतु, रिसर्चमध्ये हे सुद्धा समोर आले की हा लाभ जे कल्पवासी आणि भाविक सर्व सहा महत्वाच्या स्नानांत सहभागी झाले त्यांच्यातच दिसून आला.

VIDEO : MahaKumbh 2025: कुंभमेळाव्यात अग्नितांडव, तासभरात आग आटोक्यात

सर्व महत्वाचे सहा स्नान आवश्यक

पौष पौर्णिमा, मकरसंक्रांत, मौनी अमावस्या, वसंत पंचमी, माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्र या सर्व तिथींच्या वेळी स्नान केल्यानेच हा परिणाम दिसला. यावेळच्या महाकुंभातही संशोधन सुरू आहे. यावेळीही आम्ही एक हजार लोकांचेच नमुने गोळा केले आहेत आणि आतापर्यंत तसाच निष्कर्ष समोर आला आहे जो 2013 मध्ये दिसला होता. हर्ड इम्युनिटी येण्यासाठी सहा प्रमुख स्नान करणे गरजेचेच आहे असे डॉ. त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube