Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार! अंदाधुंद गोळीबारात दोघांचा मृत्यू

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार! अंदाधुंद गोळीबारात दोघांचा मृत्यू

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. काल येथे दोन (Manipur Violence) गटांत अंदाधुंद गोळीबार झाला होता. यात दोन लोकांचा मृत्यू झाला. तर भाजप नेत्यासह पाच जण जखमी झाले. जखमींतील काही जणांची प्रकृती (Manipur) चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षातील मे महिन्यात सुरू झालेला हिंसाचार अजूनही शांत झालेला नाही. राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही हा हिंसाचार पूर्णपणे थांबवण्यात यश मिळालेले नाही. राज्यात सातत्याने हिंसाचार घडत आहे. त्यामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

Manipur Violence : नव्या वर्षात मणिपूर पेटलं! गोळीबारात चौघांचा मृत्यू, पाच जिल्ह्यांत कर्फ्यू

द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टमधील अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की हा गोळीबार मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुरू झाला आणि बराच वेळ सुरू होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंफाळ जिल्ह्यातील कौट्रुक गावात हा गोळीबार झाला. या गोळीबारानंतर एक व्यक्ती बेपत्ता झाला आहे. या गोळीबारात भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष बरिश शर्मा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

मणिपूर पोलिसांनी सांगितले की इंफाळ पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यांच्या हद्दीवर दोन समुदायांत गोळीबार झाला. इंफाळ खोऱ्यातील कडांगबंद, कौट्रुक आणि कांगचूप गावातील लोक येथून पळून गेले आहेत. मागील एक महिन्याच्या काळात राज्याती हिंसाचाराच नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मे 2023 पासून सुरू झालेल्या हिंसाचारात 180 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

PM Modi ‘बस मणिपूर नही जायेंगे’ म्हणत मोदींच्या लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावरील फोटोंवर काँग्रेसचा हल्लाबोल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube