Stock Market : सेन्सेक्स-निफ्टीची आज सपाट सुरुवात; यूएस फेडच्या निर्णयापूर्वी शेअर बाजार सुस्त
Share Market Today : शेअर बाजार उघडण्याच्या वेळी, सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 82,973 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टीही जवळपास 30 अंकांच्या घसरणीसह 25,394 च्या पातळीवर होता. (Share Market ) निफ्टी बँक 52,204 च्या पातळीवर सपाट होता. निफ्टी मिडकॅप 61,190 च्या आसपास होता, पण नंतर त्यातही घसरण झाली.
Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान
सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती
सकाळी 9.40 वाजता बीएसई सेन्सेक्स शेअर्समध्ये तेजी दिसत होती आणि घसरणाऱ्या शेअर्समध्येही आयटी शेअर्सचा मोठा वाटा आहे. आज आयटी शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमागे एक्सेंचर हे मुख्य कारण असल्याचे पाहिले जात आहे आणि आयटी निर्देशांक सुमारे 2.50 टक्क्यांनी घसरला आहे.
ब्रिटानिया शेअर्समध्ये वाढ
NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 32 शेअर्समध्ये वाढ आणि 18 शेअर्स घसरणीसह व्यवहार होत आहेत. आज निफ्टी शेअर्समध्ये सर्वाधिक तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये हीरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, ब्रिटानिया आणि टाटा मोटर्स यांचा समावेश आहे आणि हे पाच शेअर्स टॉप 5 मध्ये आहेत. सध्या एफएमसीजी शेअर्स बघितले तर आयटीसी, एचयूएल आणि ब्रिटानिया शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे आणि आज नेस्लेही या वाढीला हातभार लावत आहे.
फेडच्या दर कपातीचा परिणाम?
फेडच्या बैठकीपूर्वी भारतीय शेअर बाजारात एक बाजूचा कल दिसून येत आहे. परंतु, आज संध्याकाळी फेड बैठकीचे निकाल येण्यास सुरुवात होईल, त्यानंतर भारतीय बाजारातही हालचाल दिसून येईल. असं मानलं जातं की फेड आपल्या आगामी बैठकीत व्याजदर कमी करेल. तसे झाल्यास गुंतवणूकदारांच्या आनंदाने शेअर बाजाराला नव्या विक्रमी उंचीवर नेले तर नवल वाटायला नको. सर्व काही अनुकूल राहिल्यास, आपण निफ्टीमध्ये 25800 ची ऐतिहासिक पातळी पाहू शकतो.
Maa Amruta : अमृता फडणवीसांना मॅडम नाही तर या नावाने संबोधणार, भाजप नेत्याचं विधान चर्तेत
जागतिक संकेत?
आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसत आहेत. आजच्या व्यवसायात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये वाढ दिसून येत आहे. याआधी मंगळवारी अमेरिकन फेडच्या निर्णयापूर्वी अमेरिकन बाजार सावध राहिले. मंगळवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 16 अंकांनी घसरला आणि 41606.18 च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite मध्ये 36 अंकांची वाढ होऊन तो 17628.06 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 1 अंकाने वाढून 5634.58 च्या पातळीवर बंद झाला.