मोठी बातमी! एनडीएचा दबदबा कायम; उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी जिंकली

महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सीपी राधाकृष्णन हे यामध्ये देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून आजच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 09 09T194755.888

Vice President Election Result : उपराष्ट्रपती पदाची आज बुधवार (9 सप्टेंबर) रोजी मतदान झालं. याचा आता निकाल समोर आला असून ही निवडणूक एनडीएने जिंकली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सीपी राधाकृष्णन हे यामध्ये देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून विजयी झाले आहेत. मात्र, इंडिया आघाडीचे काही मत फुटल्याने आता चांगलीच चर्चा तापली आहे.

इंडिया आघाडीतून क्रॉस वोटिंग

सीपी राधाकृष्णन हे आता भारताचे 17 वे उपराष्ट्रपती असणार आहेत. निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास इंडिया आघाडीतून क्रॉस वोटिंग झाले असल्याचे समोर आले आहे. (President) एनडीएकडे एकूण 427 खासदार होते, मात्र जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसच्या 11 खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केले, त्यामुळे हा आकडा 438 पर्यंत पोहोचते. मात्र सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची एकूण 452 मते मिळाली, याचा अर्थ 14 विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मते दिली. याच कारणामुळे बी सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 314 मते मिळायला हवी होती, मात्र त्यांना 300 मतांवर समाधान मानावे लागले.

मोठी बातमी! सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; निवडणुकीत इंडिया आघाडीची मते फुटली

सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे. राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. त्यांनी कोइम्बतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून बीबीए केले आहे. ते 1973 मध्ये वयाच्या 1 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. कालांतराने ते जनसंघात सामील झाले आणि सक्रिय राजकारणात आले.

भाजपचे महत्वाचे नेते

सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या महत्वाचे नेते आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्यही आहेत. ते केरळचे प्रभारी देखील होते. 2004, 2012 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते. त्यांनी महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणाचे राज्यपाल म्हणूनही काम केलेले आहे. तसेच ते काही काळ पुदुच्चेरीचे उपराज्यपालही होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या