Video : लंकेंचं सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर; दिल्लीत जाताच फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

  • Written By: Published:
Video : लंकेंचं सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर; दिल्लीत जाताच फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार  निलेस लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या इंग्रजी भाषेवरू चांगलीच जुंपल्याचे  चित्र पाहण्यास मिळाले होते. त्यानंतर लंकेनी आपण दिल्लीत जाऊन फाडफाड इंग्रजी बोलणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज ( दि.25) नव्या संसद भवनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यावेळी लंकेंनी फाडफाड इंद्रजीत खासदारकीची शपथ घेतली. त्यामुळे खासदार झाल्यानंतर आपण फाडफाड इंग्रजीत बोलणार असल्याचा शब्द लंकेनी खरा करून दाखवत विखे पाटलांच्या टीकेला उत्तर दिले आहे. (Nilesh Lanke Taks Oath Aa a MP In Fluent English)

आष्टीकरांना पुन्हा का घ्यावी लागली शपथ? महाराष्ट्रातल्या खासदारांकडून घोषणा, अध्यक्षांनी दिली समज

लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज लढतील पैकी एक लढत म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लंके ( Nilesh Lanke ) विरुद्ध विखे ( Sujay Vikhe ) . त्यात विखे आणि लंके यांच्यामध्ये प्रचारादरम्यान एकमेकांवर विविध आरोप आणि टीका करण्यात आली. त्यात विखेंनी लंकेंना इंग्लिश येत नसल्यावर टोला लगावला होता. त्यावर आता लंके यांनी खासदार म्हणून पहिल्यांदाच दिल्लीत गेल्यानंतर ‘ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत उत्तर देणार’ असं म्हणत विखेंनाआव्हान दिलं होते. त्यानंतर आज लंकेंनी संसद भवनात फाडफाड इंद्रजीत खासदारकीचे शपथ घेत विखेंना त्यांच्याच भाषेत जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.

शपथ घेतल्यानंतर हात जोडले अन्…

सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना निलेश लंके यांचे नाव पुकारले. तेव्हा निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथेला सुरुवात केली त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंके यांनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले. सध्या त्यांची ही शपथ राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.

खासदारकीची शपथ घेताच कंगनाची गजब मागणी; मुख्यमंत्री शिंदेंची खोली द्या, ठाकरे गटाचा विरोध

कुणी आईच्या पोटातू शिकूून येत नाही

प्रचारकाळात ज्यावेळी विखे आणि लंकेंमध्ये इंग्रजी भाषेवरून जुंपली होती. त्यावेळी लंकेंनी मला इंग्रजीचे धडे लावण्याची गरज नाही. तसेच कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही. पण माणूस पाण्यात पडला की, पोहायला शिकतो. तशीच ही परिस्थिती आहे. मी एकदा अंदाज घेतो. अद्याप मला संसद कुठे आहे? हे देखील माहित नाही. त्यामुळे आत गेल्यानंतर मी शिकेल की समोरच्या व्यक्तीला कोणती भाषा अभिप्रेत आहे त्याच भाषेत मी बोलेल. समोरच्याला माझी भाषा कळत नसेल तर त्याला जी भाषा समजते. त्या भाषेतच मला माझा प्रश्न मांडावा लागेल. जशास तसं उत्तर द्यावं लागेल. असं म्हणत यावेळी लंकेंनी सुजय विखेंना इंग्रजी भाषेवरून टोला लगावला होता.

काय म्हणाले होते सुजय विखे?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. प्रचारादरम्यान एका मेळाव्यात सुजय विखे यांनी निलेश लंके यांना थेट आव्हानच देऊन टाकले होते. मी जेवढी इंग्रजी बोलल तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. असे आव्हान सुजय विखे यांनी दिले होते. नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच विखे यांनी संसदेतील त्यांच्या इंग्रजी भाषणाचा एक व्हिडिओ दाखवला होता. याचाच आधार घेत सुजय विखे यांनी निलेश लंकेंना आव्हान दिले होते. महिनाभरात त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असे आव्हान दिले होते.

1 लाख रुपये वेतन, बंगला, कारसह ‘या’ सुविधांचा लाभ घेणार राज्यातील 33 खासदार

नीलेश लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेताच पारनेरमध्ये जल्लोष

लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना इंग्रजी व हिंदीतून संसदेत बोलण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान लंके यांनी स्वीकारले. खासदार होताच नीलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीतून शपथ घेतली. त्यामुळे पारनेर येथे आज लंके समर्थकांनी जल्लोष केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज