दिल्ली कोचिंग सेंटर अपघातप्रकरणी मोठी कारवाई, आणखी पाच जणांना अटक

दिल्ली कोचिंग सेंटर अपघातप्रकरणी मोठी कारवाई, आणखी पाच जणांना अटक

Delhi UPSC Student Deaths: दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरच्या (IAS Coaching Centre) तळघरात पाणी शिरल्याने (Old Rajender Nagar Incident) यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेनंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक केली. त्यानंतर आज आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

रामदेव बाबांना मुंबई हायकोर्टाचा दणका ! आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पतंजलीला कोट्यवधीचा दंड 

शनिवारी (दि. 27 जुलै) रोजी संध्याकाळी कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने एक मुलगा आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डेल्विन अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. श्रेया यादव ही विद्यार्थिनी यूपीच्या आंबेडकर नगर येथील रहिवासी होती. तर तान्या ही तेलंगणाची रहिवासी होती. नेविन हा विद्यार्थी केरळचा होता. तो जेएनयूमधून पीएचडीही करत होता. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या एकूण सात जणांना अटक आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

…अन् बाकी सगळे उंदीर दूध पीत आहेत, जातीय संघर्षावर राज ठाकरेंचं मार्मिक भाष्य

अटक केलेल्यांमध्ये कोचिंग सेंटरच्या तळघराचे गेट तोडणाऱ्या एसयूव्ही चालकाचाही समावेश आहे. या एसयूव्ही कारने पाणी साचलेल्या रस्त्यावरून जात असताना तळघराच्या गेटला धडक दिली होती. त्यामुळे हे गेट तुटले आणि पाणी आत शिरलं, असा दावा केला जातो आहे.

पोलीस उपायुक्त हर्षवर्धन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही सोमवारी तळघराच्या गेटला धडकणाऱ्या फोर्स गुरखा या गाडीच्या चालकाला अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 105 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गाडीने गेटला धडक दिलेल्या तळघरात पाणी साचलं होतं, असं ते म्हणाले. मात्र, त्यांनी गाडी चालकाचे नाव सांगण्यास नकार दिला.

रविवारी दोघांना अटक
दरम्यान, याआधी या घटनेनंतर रविवारी कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली. तसेच कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 105, 106 (1), 152, 290 आणि 35 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube