Operation Silkyara : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये बोगदा (Uttarkashi Tunnel Accident) कोसळल्याने 41 मजूर 8 दिवसांपासून अडकले आहेत. तब्बल 192 तासांच्या प्रयत्नानंतर मजूरांसाठी अन्न पाठवण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न पाठवण्यासाठी छोटा पाईप ड्रिल करण्यात आला आहे. या घटनेला 8 दिवस झाले मात्र, अद्यापही मजुरांची सुटका झालेली नाही.
वंचितची संविधान सन्मान रॅली; प्रकाश आंबेडकर राहुल गांधींना बोलवणार?
बोगद्यात ड्रिल करण्यात आलेल्या या पाईपद्वारे अडकलेल्या मजुरांना खाद्यपदार्थ, फळे, अंडी, खिचडी पाठवण्यात आली आहे. सोमवारी सकाळी एनएचआयडीसीएलच्या पथकाने सहा इंची पाईप खोदण्यास सुरुवात केली. दुपारी एकच्या सुमारास समोरून दगड आल्याने ते थांबले, मात्र दुपारी 4 च्या सुमारास हा ५७ मीटरचा पाईप पुढे ढकलण्यात पथकाला यश आले. आता 4 इंची पाईपसोबत 6 इंची पाईपद्वारे मदत साहित्य देखील कामगारांना पाठवले जाणार आहे.
‘मंदिरातल्या दानपेटी काढल्या तर पुजारी पळून जातील’; वडेट्टीवारांचं नवा वाद पेटवणारं विधान
सर्व मजूर बोगद्यात सुरक्षित असून मजुरांना जुन्या पाईपद्वारे त्यांना फक्त हरभरा, मीठ, औषधे, चॉकलेट इत्यादी पाठवणे शक्य होते, परंतु नवीन पाईपद्वारे ते फळे, अंडी यांसह आणखी खाद्यपदार्थ पाठवत आहेत कामगारांची स्थिती पाहण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला असून बोगद्यात मोठ्या प्रमाणत धूळ असल्याने चित्र स्पष्टपणे दिसत नसल्याचे एनएचआयडीसीएलचे संचालक अंशू मनीष खालखो यांनी सांगितलं आहे.
…तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं; कपिल देवच्या आमंत्रणावरून राऊतांचा निशाणा
एनएचआयडीसीएलने मजुरांना पाहण्यासाठी दिल्लीवरुन एंडोस्कोपिक कॅमेरे मागवले आहेत. मंगळवारी हे कॅमेरे पाईपद्वारे बोगद्यात पाठवले जाणार आहेत. कामगारांना जिथे कॅमेऱ्यांद्वारे त्यांना पाहता येणार आहे, तिथे ते कामगारांची स्थिती अधिक जवळून पाहू आणि समजून घेऊ शकणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, 192 तास उलटले तरीही मजुरांची अद्यापही सुटका होत नसल्याने नातेवाईकांकडून आक्रोश करण्यात येत आहे. जसेजसे जास्त दिवस उलटत आहेत. तसतसं मजुरांचं मनोधैर्य खचत असून आमची लवकर सुटका करा, अशी मजुरांकडून मागणी करण्यात येत आहे.