BJP News : सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर भाजपला धक्का देणारी आणखी एक बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे. उत्तर प्रदेशातील इटावा लोकसभा मतदारसंघाचे खासदार राम शंकर कठेरिया यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. टोरेंट पॉवर कार्यालयाची तोडफोड तसेच अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी आग्रा येथील खासदार/आमदार न्यायालयाच्या विशेष दंडाधिकाऱ्यांनी ही शिक्षा […]
Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये आज (5 ऑगस्ट) रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती. रात्री उशिरा 9.34 मिनिटांनी हे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नव्हे तर आसपासच्या भागातही जाणवले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहोर, पेशावर भागात भूकंप झाला आहे. मात्र, आतापर्यंत कुठूनही नुकसान झाल्याची माहिती […]
Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. वास्तविक, या यानाने 4 ऑगस्ट रोजी दोन तृतीयांश अंतर पूर्ण केले. त्याच वेळी, एका दिवसानंतर तो यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी (5 ऑगस्ट) सांगितले की, चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे. इस्रोने […]
MP Ram Shankar Katheria : उत्तर प्रदेशातील इटावा येथील भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांना आग्रा येथील न्यायालयाने प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. खासदार रामशंकर कठेरिया यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता. कोर्टाच्या निकालानंतर कठेरिया म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय मान्य आहे मात्र वरच्या कोर्टात अपील […]
Modi Government D2M Scheme : इंटरनेच्या युगात आज जवळपास लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण मोबाईलवर असतात. धावपळीच्या जीवनात आणि वेळेअभावी आपल्यापैकी अनेकजण विविध गोष्टी या मोबाईलवरचं बघतात. यामुळे टीव्हीचे प्रेक्षक कमी होत आहे. अशातच आता मोदी सरकारने थेट मोबाईलवरच टीव्हीचे प्रसारण करण्याची योजना आखली आहे. या योजनेची खासियत म्हणजे देशातील करोडो नागरिक कोणत्याही इंटरनेटशिवाय मोबाईलवर टीव्हीचा […]
Manipur Violence : गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून धुमसत असलेलं मणिपूर अजूनही शांत झालेलं नाही. हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना रोजच कानावर येत आहेत. आताही राज्यात पुन्हा मोठा आगडोंब उसळला आहे. मागील 24 तासांत राज्यात अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यातील नारनसैना येथे असलेले पोलिसांचे शस्त्रागार आक्रमक जमावाने शुक्रवारी लुटले. या शस्त्रागारातील एके रायफली आणि […]