“2014 नंतरचे पहिलेच अधिवेशन ज्यात विदेशातून..”, PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

“2014 नंतरचे पहिलेच अधिवेशन ज्यात विदेशातून..”, PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

PM Modi on Budget Session : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सत्राआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद भवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नवाचार, समावेशकता आणि गुंतवणूक देशाच्या आर्थिक घडामोडींचा आधार आहे. या अधिवेशन काळात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होईल आणि व्यापक विचार विनिमयासह देशाची ताकद वाढविणाऱ्या कायद्यांत या विधेयकांचे रुपांतर होईल.

यानंतर पीएम मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. 2014 पासून हे पहिलेच असे अधिवेशन आहे ज्याच्या एक ते दोन दिवस कोणतीही विदेशी ठिणगी पडली नाही. विदेशातून आग लावण्याचे प्रयत्न झाले नाहीत. मी 2014 पासूनच पाहतोय की प्रत्येक अधिवेशनाच्या आधी काहीतरी कुरापती काढण्यासाठी लोक तयार असायचे. तसेच या लोकांना हवा देण्यासाठीही येथे काही कमी नव्हती. दहा वर्षांनंतर मी हे पहिलेच असे अधिवेशन पाहतोय ज्यात व्यत्यय आणण्यासाठी विदेशातील कोणत्याही कोपऱ्यातून प्रयत्न झाले नाहीत.

Budget 2025 : रेल्वे बजेट काय होतं? सरकारने का बंद केलं.. वाचा, निर्णयामागची खरी स्टोरी..

मोदी पुढे म्हणाले, आपल्या देशाने स्वातंत्र्यांची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही अभिमानाची बाब आहे. देशातील लोकांनी मला तिसऱ्यांदा जबाबदारी दिली आहे. तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं पूर्ण बजेट आहे. 2047 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण झालेली असतील विकसित भारताचा जो संकल्प या देशाने घेतलाय त्यात हे बजेट नवीन विश्वास आणि ऊर्जा निर्माण करील.

ज्यावेळी देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल त्यावेळी देश विकसित झालेला असेल. 140 कोटी नागरिकांचे प्रयत्न या संकल्पाला पूर्णत्वास नेतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या कार्यकाळात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही मिशन मोडवर काम करत आहोत. नवाचार, समावेशकता आणि गुंतवणूक ही त्रिसूत्री आर्थिक घडामोडींचा आधार आहे. या अधिवेशनातही अनेक विधेयकांवर चर्चा होणार आहे. व्यापक विचार विनिमय झाल्यानंतर देशाची ताकद वाढविणाऱ्या कायद्यांत या विधेयकांचे रुपांतर होईल. नारीशक्तीचा गौरव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, पंथ संप्रदायाचा भेद विसरून महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे तसेच त्यांना समान अधिकार मिळावेत यासाठी या अधिवेशनात अनेक निर्णय घेण्यात येतील.

खुली अर्थव्यवस्था, ड्रीम बजेट ते मिलेनियम बजेट; वाचा, पाच अर्थसंकल्पांचा इतिहास..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube