Mahakumbh Pillars : यंदा महाकुंभ मेळा (Maha Kumbh Mela) उत्तर प्रदेशमधील प्रयागराज (Prayagraj) येथे आयोजित करण्यात आला. हा कुंभमेळा १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मेळ्यात लाखो भाविक सहभागी होणार आहेत. १२ वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकार विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ८४ स्तंभ बसवत आहे. लाल वाळूचा दगड कापून बनवलेल्या या स्तंभांना ‘आस्थेचे स्तंभ’ असे नाव देण्यात आलं. दरम्यान, या स्तंभांची खासियत काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
बीड प्रकरणावर धसांचं नाव घेत पंकजा मुंडे पहिल्यांदाच बोलल्या म्हणाल्या, त्यांच्यामुळे…
१७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या स्तंभावर भगवान शिवाची १०८ नावे लिहिली आहेत. त्याचप्रमाणे, सनातनचे प्रतीक असलेले कलश सर्व स्तंभावर ठेवलेले आहेत. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव अमृत अभिजात यांच्या मते, हे स्तंभ राजस्थानमधील बन्सी पहाडपूर येथे बनवण्यात आले. प्रत्येक स्तंभाच्या बांधकामाचा खर्च सुमारे २० लाख रुपये आहे.
या स्तंभाची खासियत सांगताना ते म्हणाले की, जेव्हा कोणताही साधक या स्तंभांची प्रदक्षिणा पूर्ण करतो तेव्हा त्याला असे वाटेल की त्याने ८४ लाख जन्मांची यात्रा पूर्ण केली आहे. या ८४ स्तंभाचे परिभ्रमण विश्वाच्या परिभ्रमणाइतकेच असेल. याच परिक्रमेत साधकांना सनातन धर्म आणि तत्वज्ञानाच्या सखोल शिकवणींचे ज्ञान होईल. महाकुंभ ते विमानतळ रस्त्यावर हे स्तंभ बसवणाऱ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांच्या मते, खरी कारागिरी ही हे स्तंभ व्यवस्थित उभे करण्यात आहे. हे ८४ स्तंभ चार भागात बसवलेले जात आहेत.
गोदाकाठ महोत्सवातून महिलांना हक्काची आर्थिक सावली; आमदार आशुतोष काळे
४ भागांमध्ये बसवले जात आहेत स्तंभ
अधिकाऱ्यांच्या मते, हे खांब चार भागात विभागून बसवले जात आहेत. प्रत्येक भागात २१ खांब असतील. हे चार भाग सनातन धर्माच्या चार वेद, चार आश्रम, चार वर्ण आणि चार दिशांचे प्रतिनिधित्व करतात. एवढेच नाही तर डावीकडून उजवीकडे प्रत्येक स्तंभ १ लाख योनींचा प्रवास दर्शवेल. जेव्हा या स्तंभाची एक फेरी पूर्ण होईल, तेव्हा ८४ लाख योनिंचा प्रवास पूर्ण होईल. या प्रत्येक स्तंभावर भगवान शिवाची १०८ नावे लिहिलेली आहेत आणि ही नावे देखील चार भागात लिहिली आहेत.
प्रत्येक माणसाला मानवी जीवनाची चार उद्दिष्टे – धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष – साध्य करण्यासाठी ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास इत्यादी टप्प्यांतून जावे लागते. अगदी तसंच श्रद्धेचे हे स्तंभ भक्तांना खात्री देतात की शिवाच्या कृपेने त्यांचा जन्म झाला आणि शिवाच्या कृपेमुळेच ते मृत्युच्या चक्रातून मुक्त होतील. थोडक्यात हे स्तंभांकडे मोक्ष मिळविण्याचा हा एक प्रतीकात्मक मार्ग म्हणून पाहिले जात आहे.