ठरलं! राहुल गांधींनी पवारांचं आमंंत्रण स्वीकारलं; पंढरीच्या वारीत होणार सहभागी, तारीख आली समोर

  • Written By: Published:
ठरलं! राहुल गांधींनी पवारांचं आमंंत्रण स्वीकारलं; पंढरीच्या वारीत होणार सहभागी, तारीख आली समोर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह प्रणिती शिंदे (Praniti Shinde) , धैर्यशील मोहिते (Darishsheel Mohite) यांनी राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये नुकतीच  भेट घेतली होती. या भेटीवेळी पवारांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी राहुल गांधींनी याबाबत लवकरच कळवतो असे सांगितले होते. त्यानंतर आता राहुल गांधींच्या वारीत सहभागी होण्याबाबत मोठी अपडेट समोर आली असून, येत्या 14 जुलै रोजी राहुल गांधी 14 जुलै 2024 रोजी वारीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती  पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी दिली आहे. याबाबत टीव्ही 9 ने वृत्त दिले आहे.

बालबुद्धी म्हणून सोडू नये, कठोर कारवाई व्हावी; मोदींकडून राहुल गांधींच्या हिंदूंबाबतच्या वक्तव्याचा समाचार

वारीच्या माध्यमातून विधानसभेसाठी तयारी 

आगामी काळात म्हणजेच साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती (Mahayuti) तसेच महाविकास आघाडीने (MVA) निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता महाविकास आघाडीने राहुल गांधींना (Rahul Gandhi) वारीत सहभागी होण्यासाठी म्हणून आमंत्रित केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राहुल गांधी पंढरपूरच्या वारीत सहभागी झाल्याने याचा फायदा महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो अशी भावना मविआच्या नेत्यांमध्ये आहे.

शरद पवारांना निमंत्रण द्यायचा अधिकार कुणी दिला?

एकीकडे राहुल गांधी पंढरीच्या वारीत सहभागी होण्याची तारीख समोर आलेली असताना दुसरीकडे या आमंत्रणावरून राजकारण तापण्यास सुरूवात झाली असून, हिंदुंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधींना वारीत येण्याचं निमंत्रण द्यायचा अधिकार मौलाना शरद पवारांना कोणी दिला? असा सवाल   तुषार भोसलेंचा सवाल आचार्य तुषार भोसलेंनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पंढरीच्या वारीला मिळणार ग्लोबल टच; अजितदादांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

पवार कधी वारीत सहभागी झाले  नाही

यावेळी तुषार भोसलेंनी पवारांच्या वारीत सहभागी होण्यावरूनही भाष्य केले. ते म्हणाले की,  शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते. पण शरद पवारांचे त्यांच्या 84 वर्षांच्या आयुष्यात पाय कधी वारीकडे वळले नाहीत आणि ते कोणत्या तोंडाने राहुल गांधीला निमंत्रण देत आहेत? असेही भोसलेंनी म्हटले आहे.

मी वारीत नव्हे तर, पालखीच्या स्वागतासाठी थांबणार

येत्या 7 जुलै रोजी शरद पवार तुकोबांच्या वारीत चालणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर स्वत: पवारांनी स्पष्टीकरण देत मी वारीत चालणार नसून केवळ पंढरपूरला जाणाऱ्या पालखीच्या स्वागतासाठी थांबणार असल्याचे स्पष्ट केले आहे . वारी माझ्या गावावरून जाते त्यामुळे त्या ठिकाणी मी एक दिवस थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज