घरात तलवार अन् चाकू ठेवले पाहिजेत; RSS नेत्यांचं हिंदुंना आवाहन

घरात तलवार अन् चाकू ठेवले पाहिजेत; RSS नेत्यांचं हिंदुंना आवाहन

RSS : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) 28 जणांवर गोळीबार करुन जीव घेतलायं. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळत असून भारतानेही पाकिस्तानविरोधात धोरणं आखली आहेत. अशातच आता हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते प्रभाकर भट यांनी सूचक विधान केलंय. स्वत:च्या आत्मरक्षणासाठी घरात तलवार अन् चाकू ठेवले पाहिजेत, असं विधान भट यांनी केलंय. केरळच्या कासरगोडमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

काहीतरी मोठं घडणार? वेळ अन् टार्गेट तुम्हीच ठरवा, PM मोदींचा सैन्याला फ्रि हँड

पुढे बोलताना प्रभाकर भट म्हणाले, प्रत्येक हिंदुच्या घरात तलवार असली पाहिजे, जर पहलगाम हल्ल्यादरम्यान, हिंदुंनी तलवार दाखवली असते तर तेही खूप झालं असतं. महिलांनीही आपल्या बॅगमध्ये सामानासोबतच चाकू ठेवावा, असं आवाहन भट यांनी केलंय.

रात्री अडीचला दचकून उठले, समोर रायफलवाला…आठवडा उलटला तरी जगदाळे कुटुंब धक्क्यातच

6 इंच चाकू ठेवण्यास काही हरकत नाही…
आपल्या आत्मपरिक्षणासाठी 6 इंच चाकू ठेवण्यासाठी परवान्याची आवश्यकता नाही. रात्रीच्यावेळी तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर हल्ला होण्याची शक्यता आहे. हल्लेखोरांना विनंती न करात त्यांना चाकू दाखवला पाहिजे, असं भट म्हणाले आहेत. आधी हिंदु-मुस्लिम वादात हिंदु पळून जात होते. आता यामध्ये बदल दिसून येत आहे. आता आपण घरात तलवार ठेवली पाहिजे, असंही प्रभाकर भट यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे आज दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला असून या हल्य्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे तर 20 जखमी झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली आहे. तर या हल्ल्यामध्ये अनेक थरारक हत्या झाल्याचं समोर आलं आहे. एका दाम्पत्यातील पतीला त्याचा धर्म विचारला अन् त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. याचा थरारक घटनाक्रम पत्नीने सांगितला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube