शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्समध्ये 1235 अंकांची घसरण, 7.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान

शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्समध्ये 1235 अंकांची घसरण, 7.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान

Share Market News Sensex Tumbles 1235 Points Nifty Slides : भारतीय शेअर बाजारांमध्ये (Share Market) आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1,235 अंकांनी घसरला. निफ्टी 300 अंकांनी घसरून 23,000 च्या जवळ पोहोचला. यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 7.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर वाढलेली अनिश्चितता आणि कंपन्यांचे कमकुवत तिमाही निकाल यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढलीय. ट्रम्प यांनी पहिल्याच दिवशी कॅनडा (Stock Market) आणि मेक्सिकोवर 100 टक्के कर लादण्याची घोषणा केली. त्याच वेळी, जर डॉलरविरुद्ध कारवाई केली तर भारतासह ब्रिक्स देशांवर शुल्क लादण्याचा इशारा देण्यात आलाय.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 2 टक्क्यांनी घसरण झाली. सर्व क्षेत्रीय निर्देशांक देखील लाल रंगात बंद झाले होते. रिअल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स, आयटी आणि बँकिंग समभागांमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. व्यवहार बंद होताना, बीएसई सेन्सेक्स 1,235.08 अंकांनी वाढून 75,838.36 वर बंद झाला. 50 शेअर्सचा एनएसई निर्देशांक 299.45 अंकांनी वाढून 23,045.30 वर बंद झाला.

Sanjay Shirsath : जे संपलेत त्यांच्यावर बोलून काय होणार; पालकमंत्री शिरसाटांचा खैरे, दानवेंना टोला

सेन्सेक्सच्या (Sensex) 5 शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी बाजारात मोठी विक्री दिसून आली. यामुळे बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स, निफ्टी (Nifty) सुमारे दिड टक्क्याने घसरून बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून आली. बीएसईच्या सर्व क्षेत्र निर्देशांकांमध्ये विक्री दिसून आली. रिअल्टी, एनर्जी, पीएसई समभागांमध्ये घसरण दिसून आली. ऑटो, बँकिंग, आयटी समभागांमध्ये विक्री दिसून आली.

केटो डोनेट नाऊ बीएसई सेन्सेक्सच्या 30 पैकी 28 शेअर्समध्ये आज घसरण झाली. यामध्येही झोमॅटोचे शेअर्स सर्वाधिक तोट्यात राहिले, ज्यात 10.93 टक्के घसरण झाली. दुसरीकडे, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांचे शेअर्स 2.57 टक्क्यांनी घसरून 3.51 टक्क्यांवर आले. बाजारातील घसरण अतिशय तीव्र होती, सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी आज फक्त 2 शेअर्स तेजीत बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स 0.76 टक्क्यांनी आणि एचसीएल टेकचे शेअर्स 0.49 टक्क्यांनी वधारून बंद झाले.

ठाकरेंना मोठा धक्का! शहरप्रमुखासह 35 पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेश?

आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये घसरणीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती. आज एक्सचेंजवर एकूण 4,088 शेअर्सची खरेदी-विक्री झाली. यापैकी 1,187 शेअर्स वाढीसह बंद झाले. तर 2,788 शेअर्समध्ये घसरण झाली. तर 113 शेअर्स कोणत्याही चढ-उतारांशिवाय स्थिर होते. आजच्या व्यवहारात 103 समभागांनी 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला. त्याचवेळी 67 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या नवीन नीचांकी पातळीला स्पर्श केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube