हा खून पूर्ण पूर्वनियोजित, भाजप या गुंडांना… पीएच्या हत्येनंतर अधिकारी भडकले तर हल्ल्यानंतर टीएमसीची मोठी मागणी
Shubhendu Adhikari PA Murder नंतर अधिकारी भडकले तर हत्येवर तृणमूलकडून देखील घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Shubhendu Adhikari Angry after Murder of PA TMC also Demend for CBI Investigation : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेपुर्वीच रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. या संघर्षामध्ये बुधवारी रात्री एक रक्तरंजित ठराविक घटना घडली. ती म्हणजे भाजपचे पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सुवेंदू अधिकारी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये ते भडकल्याचं पाहायला मिळालं. तसेच या हत्येवर तृणमूलकडून देखील घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पीएच्या हत्येनंतर अधिकारी भडकले…
हा एक पूर्वनियोजित खून आहे, आणि डीजीपींनी हेच सांगितले आहे. 2-3 दिवस रेकी करण्यात आली आणि हा खून पूर्णपणे पूर्वनियोजित होता. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आम्ही दुःखी आहोत आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. दिल्लीतील आमच्या संपूर्ण नेतृत्वाने याची माहिती घेतली आहे. केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी (मृताच्या) कुटुंबीयांशी आणि पोलिसांशी चर्चा केली… विविध नेते आणि निवडक आमदार आपापल्या भागातून येथे आले आहेत… पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत आणि ते तपास करतील… हा 15 वर्षांच्या महा-जंगलराजचा परिणाम आहे… भाजप येथील गुंडांना हटवण्याचे काम सुरू करेल.
We strongly condemn the brutal murder of Chandranath Rath in Madhyamgram tonight, along with the killing of three other TMC workers in incidents of post-poll violence allegedly carried out by BJP-backed miscreants over the last three days, despite the Model Code of Conduct being…
— All India Trinamool Congress (@AITCofficial) May 6, 2026
हल्ल्यानंतर टीएमसीची मोठी मागणी
आदर्श आचारसंहिता लागू असतानाही, गेल्या तीन दिवसांपासून भाजप-समर्थित समाजकंटकांनी केलेल्या निवडणुकीनंतरच्या हिंसाचारात, आज रात्री मध्यमग्राम येथे चंद्रनाथ रथ यांची निर्घृण हत्या, तसेच इतर तीन तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. या प्रकरणात शक्य तितकी कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. यामध्ये न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीचा समावेश असावा, जेणेकरून जबाबदार व्यक्तींना ओळखले जाईल आणि त्यांना विनाविलंब न्याय दिला जाईल. लोकशाहीत हिंसाचार आणि राजकीय हत्यांना स्थान नाही आणि दोषींना लवकरात लवकर जबाबदार धरले पाहिजे.