अबब! महाकुभांत नाशकातील व्यक्तीने विक्रीस ठेवला 6 लाखांचा शंख…
Six Lakh Rupees Conch Shell In Mahakumbh 2025 : महाकुंभात (Mahakumbh 2025) एका शंख चर्चेचा विषय ठरलाय. एका व्यावसायिकाच्या स्टॉलवर तब्बल 6 लाख रुपये किमतीचा शंख आहे. विशेष म्हणजे हा शंख विक्रेता महाराष्ट्रातील आहे. आजवर आपण अनेक प्रकारचे शंख पाहिलं असतील. शंख वाजला की मन् कसं प्रसन्न होतं बरं. शंखधुनी नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो, असं मानलं जातं. एक शंख दोनशे ते चारशे रूपयांना पूजा साहित्याच्या दुकानात मिळतो. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरूयं. तिथं संगम परिसरात (Uttar Pradesh) महाराष्ट्रातल्या एका व्यावसायिकाने शंखविक्रीचं दुकान थाटलंय. यामध्ये तब्बल सहा लाख रूपये किमतीचा एक शंख आहे, हा शंख बघून अनेकांचे डोळे विस्फाटलेत.
नाशिकहून आलेल्या इंद्रा पवार यांनी महाकुंभमेळ्यात आखाडा नगर सेक्टर 20 जवळ शंखांचं दुकान थाटलंय. त्यांच्याकडे अनेक प्रकारचे शंख आहेत, त्यांच्या किंमती देखील भिन्न आहेत. दोन फूट लांब अन् दहा इंच गोल असणारा (Six Lakh Rupees Conch Shell) शंख..या शंखावर सगळ्यांच्या नजरा खिळल्यात. दुकानासमोरून जाताना येताना लोक शंखाकडे पाहून तिथंच थांबत आहेत…पण किंमत ऐकल्यावर मात्र धक्काच बसतोय.
शंख एवढा महाग आहे, म्हटल्यावर नक्कीच त्यात काहितरी खासियत असणार. इंद्र पवार यांनी उज्जैनहून हा शंख विक्रीसाठी आणलाय. असं सांगितलं जातंय की, हा विष्णू शंख आहे. या शंखाचा लक्ष्मीपूजनात वापर केल्याने धन आणि धान्यात बरकत येते. हा शंख गुजरातमधील जामनगर येथील बेट द्वारिका नावाच्या ठिकाणी समुद्रात सापडतो. शंख विक्रेते इंद्रा पवार सांगतात की, शंख तब्बल पंचवीस लाखापर्यंत सुद्धा विकले जातात. देशातील प्राचीन सिद्ध मंदिरांत आणखी महागडे शंख आहेत. धार्मिक दृष्टिकोनानुसार शंखांची वैशिष्ट्ये बदलतात.
या शंखातून मंदिरात शंखध्वनीऐवजी जल अर्पण केलं जातं. समुद्रात या प्रकारचा शंख मिळणे खूप अवघड असल्याचं सांगितलं जातंय. आता एवढा महाग शंख कोण विकत घेणार? एवढी मोठी किंमत कोण मोजणार असे देखील प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तर या प्रश्नावर शंखविक्रेते इंद्रा पवार सांगतात की, महाकुंभाला अनेक श्रीमंत लोकही आले. शंखासाठी खरेदीदार नक्की सापडेल, अशी मला आशा आहे. आता सहा लाख रूपयांचा शंख कोण विकत घेतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाकुंभाचा आज 12 वा दिवस आहे. आतापर्यंत विक्रमी संख्येने 10 कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केलंय. आजपासून महाकुंभात बाहेरील वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. संगम तीरावर मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी येत आहेत.