देशभरात गाजत असलेल्या ‘NEET’परीक्षा घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन? दोन संशयित शिक्षकांची झाली चौकशी

देशभरात गाजत असलेल्या ‘NEET’परीक्षा घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन? दोन संशयित शिक्षकांची झाली चौकशी

NEET Paper Leak Case : देशभरात सध्या ‘NEET’परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याच्या बातमीने चांगलच वादळ घातलं आहे. (NEET) विद्यार्थ्यांनी केलेल्या या आरोपानंतर तपास यंत्रणा चांगलीच हादरली आहे. सध्या ही तपास यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागल्याचं चित्र आहे. दरम्यान, नीट पेपरफुटीप्रकरणात आता महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. (Paper Leak) याप्रकरणात शनिवारी एटीएसच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना नांदेड एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलं. तसंच, यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं आहे. गरज पडल्यास पुन्हा बोलावलं जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दोन्ही शिक्षक लातूर जिल्ह्यात खासगी शिकवणी वर्ग चालवतात.

अनेक राज्यांमध्ये गैरप्रकार पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदार मोहितेंच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं, एकाचा मृत्यू

एटीएसकडून ताब्यात घेतलं असून सध्या या दोन्ही शिक्षकांची कसून चौकशी सुरू असल्याच सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे तपासात नेमकं काय समोर येतं, याकडं सर्वांचं लक्ष सध्या लागलेलं आहे. एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) या एजन्सीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वात मोठ्या NEET परीक्षेत देशभरातील अनेक राज्यांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

मोठी गडबड झाल्याचं समोर

वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात २३ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ‘नीट’ची परीक्षा दिलेली आहे. परंतु, निकालानंतर ग्रेस गुण आणि काही राज्यांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या गोंधळानंतर ‘नीट’ परीक्षेमध्ये मोठी गडबड झाल्याचं विदारक समोर आलं आहे. त्यामुळे संशय वाढला आहे. तर, परराज्यांत जाऊन परीक्षा देणं, तसंच वाढलेला निकाल या संदर्भाने अनेक चर्चा सुरू आहेत.

तपास सीबीआयकडे मन सुन्न करणारी घटना! लेकीच्या घरीच वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

गुजरात, पंजाब, हरयाणा आणि बिहार या राज्यांत नीट पेपरफुटीच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनंतर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यात अनुषंगाने आता महाराष्ट्रातही ‘एटीएस’च्या पथकाने तपास सुरू केला आहे. शनिवारी लातूर जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, या गैरप्रकारामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय तसंच ईडीकडे सोपवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज