टीएमसीत उभी फूट; ममतादिदींच्या बैठकीला खासदार, आमदारांची पाठ ! भाचा अभिषेक बॅनर्जीबाबत मोठा निर्णय

Mamata Banerjee- 80 पैकी 8 आमदार व चार खासदार बैठकीला उपस्थित राहिले. तसेच लोकसभा आणि राज्यसभेतील बहुतांश खासदारही बैठकीपासून दूर राहिल्याने पक्षातील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

  • Written By: Published:
Mamata Banerjee

Mamata Banerjee: पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षातील अंतर्गत संघर्ष आता टोकाला गेला आहे. माजी मुख्यमंत्री व पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या हातातून पक्ष गेल्यासारखी परिस्थिती आहे. सत्तेत असताना पक्षावर वचक असलेल्या ममता बॅनर्जी यांच्याकडे आता आमदार, खासदारांनी पाठ फिरविली आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील कालीघाट निवासस्थानी शुक्रवारी महत्त्वाच्या बैठकी आयोजित करण्यात आली होती. 80 पैकी 8 आमदार व चार खासदार बैठकीला उपस्थित राहिले. तसेच लोकसभा आणि राज्यसभेतील बहुतांश खासदारही बैठकीपासून दूर राहिल्याने पक्षातील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

मोठी बातमी : मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळणार, जरांगेंच्या मागणीला यश

टीएमसीच्या एकूण 80 आमदारांपैकी दोन-तृतीयांशहून अधिक नेते आता उघडपणे बंडखोरीच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच 60 आमदारांनी एका महत्त्वाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. आता तब्बल 72 आमदार गैरहर राहिले आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीतील अत्यल्प उपस्थितीमुळे पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक आमदार आणि खासदार पक्षाची दिशा तसेच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

World Environment Day : चित्रनगरीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न


खासदारांची अनुपस्थिती चिंताज
नक
बैठकीला पक्षाच्या 28 लोकसभा खासदारांपैकी केवळ 4 खासदार उपस्थित होते. तर राज्यसभेतील 13 सदस्यांपैकी 11 सदस्य गैरहजर होते. ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे बैठकीला उपस्थित होते. राज्यसभेतून केवळ डेरेक ओ ब्रायन आणि डोला सेन हेच बैठकीत सहभागी झाले. आमदारांमध्ये मदन मित्रा, बीना मंडल, आशिमा पात्रा, फिरहाद हकीम, कुणाल घोष, सोवनदेब चट्टोपाध्याय, बिमान बॅनर्जी आणि अशोक देब यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय स्तरावर नवीन नियुक्त्या
बैठकीत दोन नवीन राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीसांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. डेरेक ओ’ब्रायन आणि डोला सेन हे आता राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना सहाय्य करणार आहेत.

ऋतब्रत बॅनर्जीविरोधात टीएमसी कोर्टात
पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर नेते ऋतब्रत बॅनर्जी यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते मान्यता दिली आहे. त्याविरोधात तृणमूल काँग्रेसने
सोमवारी कोलकाता हाकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी दिली आहे. हा निर्णय TMCप्रमुख आणि ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी सायंकाळी बोलावलेल्या बैठकीत घेण्यात आला.

follow us