तृणमूल इंडिया आघाडीला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देणार? शिष्टमंडळाने घेतली ठाकरेंची भेट
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणूक पार पडली असून यामध्ये दोन्ही बाजूने कुणाला बहुमत मिळालं नाही. (India Alliance) त्यामुळे परिस्थिती आघीड युतीची आहे. सध्यातरी एनडीए मित्रपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, पश्चिम बंगालसह काही राज्यांतील स्थानिक पक्षांनी एकला चलो रे चा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढवली. परंतु, आता लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येताच पक्षांची जुळवा जुळव आणि आघाड्यांना पाठिंबा देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. (Trinamool Congress) तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि नेते डेरेक ओ ब्रिएन यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.
मोदींचा पक्ष अल्पमतात तर यूपीमध्ये भाजपने जागा गमावल्या असत्या, इंडिया आघाडीचा बसपाने केला खेळ खराब
राऊत म्हणाले, आज तृणमूल काँग्रेसचे नेते सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि नेते डेरेक ओ ब्रिएन यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. आपच्या सर्व नेत्यांनीही आज उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही चर्चा केली. नरेंद्र मोदींचा पक्ष अल्पमतात आहे. त्यांना बहुमत मिळालं नाही. मात्र, ते सरकार बनवत आहेत. खिचडी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्हाला माहिती आहे की ही खिचडी शिजणार नाही असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
त्याचबरोबर देशहितासाठी कोणता निर्णय घ्यायचा, काय करता येईल याबाबत ममता बॅनर्जी यांनी त्यांचं शिष्टमंडळ पाठवलं होतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ‘ही सदिच्छा भेट होती. विचारांचं आदान-प्रदान होतं. भविष्यात कोणती पावलं टाकायची याबाबत चर्चा सुरू आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यास ते टीकेल की नाही हे याबाबत शंका आहे. त्यामुळे देशाच्या हितासाठी काही राजकीय पक्ष चर्चा करत आहेत, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
बाहेरून पाठिंबा दिला जाईल नव्याने सत्तेत येणार मोदी सरकार फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामण यांच्या पतीचे मोठे विधान
पश्चिम बंगालमध्ये ४२ लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी २९ जागांवर तृणमूलने उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 17 जागांवर तृणमूल काँग्रेस विजयी ठरला आहे. तर, भाजपाने १२ उमेदवार उतरवले होते, त्यांपैकी ६ उमेदवार विजयी झाले आहेत. तर, काँग्रेसचा एकमेव खासदार संसदेत गेला आहे. म्हणजेच. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच वरचढ ठरला आहे. त्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दर्शवल्यास इंडिया आघाडी बहुमताच्या जवळपास पोहोचू शकते. दरम्यान,काहीच दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी घोषित केलं होतं, इंडिया आघाडीने सत्ता स्थापन केल्यास त्यांना बाहेरून पाठिंबा दिला जाईल. त्यामुळे येत्या काळात देशात इंडिया आघाडीची सत्ता येतेय की एनडीए सरकार स्थापन करतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे.