केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल; महाराष्ट्रात कुणाला मिळणार संधी?

Union Cabinet Expansion केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Union Cabinet Expansion

Union Cabinet Expansion soon who will get opportunity in Maharashtra : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पक्ष संघटनेतील फेरबदल या दोन्ही बाबींवर वरिष्ठ स्तरावर सखोल चर्चा सुरू आहे. या प्रक्रियेत काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, तर काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Dhamaal 4 : पुन्हा ‘गुलाबी’ रंगाची जादू; ‘साडी’ गाण्याचा टीझर प्रदर्शित!

अलीकडील राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे मित्रपक्षांबरोबरच नुकतेच एनडीएमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांनाही केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधित्व देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील काही प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

Balan The Boy : ‘बालन द बॉय’ पाहून अभिनेता सूर्या भावूक ; दिला खास मेसेज

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (शिंदे गट)चे खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जासह स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून वेगळे झालेल्या खासदारांपैकी काकोली घोष, सुदीप बंदोपाध्याय आणि शताब्दी राय यांच्या नावांचाही विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी एका नेत्याला मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.

खासगी रुग्णालयांना मनमानी शुल्काला लागणार लगाम; राज्य सरकारच लवकरच ठोस धोरण येणार

याशिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून वेगळे झालेले खासदार संजय दिना पाटील यांचे नावही संभाव्य मंत्र्यांच्या यादीत असल्याची चर्चा आहे. मित्रपक्ष आणि नव्याने सोबत आलेल्या नेत्यांना योग्य प्रतिनिधित्व देऊन एनडीएची राजकीय ताकद अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

धक्कादायक! मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दिल्ली नियंत्रण कक्षाला मध्यरात्री धमकीचा फोन

केवळ नव्या मंत्र्यांची नियुक्तीच नव्हे, तर काही विद्यमान मंत्र्यांच्या जबाबदाऱ्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेले पंकज चौधरी आणि हर्ष मल्होत्रा यांना संघटनेत अधिक सक्रिय भूमिका देण्यासाठी केंद्र सरकारमधून मुक्त केले जाऊ शकते. तसे झाल्यास त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! MPSC च्या राज्यसेवेसह गट-ब, क पूर्व परीक्षा ऑनलाईन अन् वर्षातून 2,3 वेळा होणार

भाजप संघटनात्मक पातळीवरही व्यापक फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. पक्ष राष्ट्रीय स्तरावर किमान दोन महिला उपाध्यक्षांची नियुक्ती करू शकतो. तसेच त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेशातील काही वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

follow us