दीड तासांत लोकसभेची रणनीती आखली; अमित शाहांचा मोलाचा कानमंत्र…
Amit Shah Meeting News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीनंतर आता महायुतीच्याही मॅरेथॉन बैठकांना सुरुवात झाली. लोकसभेच्या जागावाटपाचा मुद्दा, मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अमित शाह यांनी अकोल्यात महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेत्यांशी दीड तास चर्चा करुन कानमंत्र दिला आहे.
मोठी बातमी : नक्षलवादी प्रकरणात DU चे माजी प्राध्यापक साईबाबांसह 5 जण निर्दोष; जन्मठेपही रद्द
लोकसभा निवडणुकीसाठी आजही ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीतच महायुतीतील घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या जागा, लोकसभेसाठी दावेदार उमेदवार, तसेच मतदारसंघाची चाचपणी करुन उमेदवारी घोषित करण्यात येण्याच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे.
‘एअरहोस्टेस विनयभंग’ प्रकरणी खुलासा करणार का? लोंढेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल
अमित शाहा यांचा कानमंत्र :
केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांची यादी जनतेपर्यंत पोहोचवा.
महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांसाठीही काम करा.
भाजपचा उमेदवार समजूनच काम करा.
प्रत्येक बूथ मजबूत राहील याकडे लक्ष द्या.
Prakash Ambedkar यांचा महाविकास आघाडीला दणका; तीन उमेदवारांची घोषणाही केली
तब्बल दीड झालेल्या बैठकीनंतर भाजपच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच ज्या कारणामुळे मागे पडतो, ती कारणे शोधून आपल्या पक्षाच्या उमेदवरांना निवडून आणायचं हेच समीकरण या बैठकीत मांडण्यात आलं आहे. तसेच या सहाही मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवरांना निवडून आणण्याचा विश्वास भाजपच्या सर्वच नेत्यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीला भाजपचे महत्वाचे मानले जाणारे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.