चिंचवड विधानसभेवरून दीर-भावजयीमध्ये गृहकलह ? तर मतदारसंघावरही राष्ट्रवादीचा ‘डोळा’
Ashwini Jagtap Claimed Chinchwad Assembly seat : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची रणधुमाळी सुरू होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत तीन-तीन पक्ष आहेत. त्यामुळे आता जागा वाटपांवर खलबते सुरू झाले आहेत. चिंचवड विधानसभा (Chinchwad Assembly) मतदारसंघात स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी (Ashwini Jagtap) या पोटनिवडणुकीत आमदार झाल्या आहेत. परंतु आता या जागेवर त्यांचे दीर शंकर जगताप यांना दावा सांगितला आहे. तर अश्विनी जगताप यांनीही या जागेची उत्तराधिकारी मीच आहे, असा दावा केला आहे. दीर-भावजयीमध्ये एका अर्थाने या जागेबाबत कलह सुरू झाल्याचे दिसून आले आहे. त्यात चिंचवडच्या जागेवर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून दावा सांगितला जात आहे. त्यामुळे या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
आमदार अन् नेते सोडून जाण्याच्या भीतीने सुनेत्रा पवारांना खासदारकी; रोहित पवारांचा दावा
या जागेबाबत दावा करताना अश्विनी जगताप म्हणाल्या, राज्यात महायुतीचे सरकार आहे. महायुतीचा धर्म सगळ्यांनी पाळला पाहिले. मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार केला आहे. चिंचवड मतदारसंघ भाजपचा आहे. भोसरी मतदारसंघही भाजपलाच सुटलेला आहे. पिंपरी मतदारसंघ हा राष्ट्रवादी मिळेल. त्यामुळे युतीचा धर्म पाळणे सर्वांनाच आवश्यक आहे.
मोठी बातमीः पोस्को प्रकरणात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट !
चिंचवडच्या जागेवर दीर शंकर जगताप यांनी दावा केल्याबाबत अश्विनी जगताप म्हणाल्या, खरं तर प्रत्येकाला आपली इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ही लोकशाही आहे. त्यामुळे इच्छा व्यक्त करणे हे प्रत्येकाला लोकशाहीला धरूनच आहे. मला विचारलं तर मी पण चिंचवडची आमदार आहे. मी चिंचवडसाठी इच्छुक उमेदवार आहे. कारण माझे पती गेल्यानंतर तेरा दिवसानंतर निवडणूक जाहीर झाली. भाजपने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. मला उमेदवारी दिली आहे. सगळ्यांनी प्रयत्न केले आहे. 36 हजार मतांचे लीडने निवडून दिले आहे. हा मतदारसंघात माझ्या पतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे उत्तराधिकारी मीच आहे. मला महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे. मतदारसंघातील शास्ती माफी असे की कचरा डेपोचा प्रश्न मी ते सोडलेले आहेत. त्यामुळे साहेबांचा (लक्ष्मण जगताप) आशीर्वाद माझ्याच पाठीशी आहे.
तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी दावा सांगितला आहे. पोटनिवडणुकीत नाना काटे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. काटे आणि जगताप अशी लढत झाली होती. पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार, तर नाना काटे यांना 99 हजार मते मिळाली होती. अपक्ष उमेदार राहुल कलाटे यांनी चाळीस हजार मते घेतली होती.