मी राज्यात टीम पाठवलेली नाही, कोणताच आदेश दिलेला नाही ; जरांगे पाटलांचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य

मी राज्यात टीम पाठवलेली नाही, कोणताच आदेश दिलेला नाही ; जरांगे पाटलांचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य

Manoj Jarange Patil Appeal To Maratha Voters : राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) मतदान होत आहे. काल रात्री प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक त्यांनी माघार घेतली. अशातच आता एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर आलेली आहे. काही तरूण गावोगावी फिरत असून आम्हाला जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पाठवलं आहे, त्यांचा आदेश आलाय की, ‘या’च उमेदवाराला मतदान करा. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अशा कोणत्याच तरूणांना मी पाठवलेलं नाही, असं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, काहीजण माझ्याजवळ येवून बसतात. माझ्यासोबत फोटो काढतात. त्यानंतर आपापल्या मतदारसंघात जावून सांगतात की, आदेश आला आहे याला पाडा, त्याला पाडा वैगेरे. हे सगळं खोटं आहे. मी माझ्या मायबाप मराठ्यांना सरळ सांगतो की, संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या वैयक्तिक भूमिकेवर काम करतंय. ज्याला पाडायचं त्याला पाडत आहेत, ज्याला निवडून आणायचं त्याला आणत आहेत. त्यांना कोणाला तरी मतदान करावं लागणार आहे, तुम्ही कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा या भूमिकेवर मी आजही ठाम आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

हास्य-विनोदाचा कल्ला करत आला ‘श्री गणेशा’चा टिझर; २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार

कोणीतरी माझ्या जवळचं म्हणून चाललं आहे. तिकडे जावून सांगत आहे की, आदेश आलाय. मी राज्यात टीम पाठवलेली नाही. कोणालाच कोणत्याच मतदारसंघात पाठवलेलं नाही. पाठवणार देखील नाही. काही जिल्ह्यांमध्ये काही तरूण असे फिरत असल्याचं समोर आलंय. ते घरोघरी जावून सांगत आहेत की, आम्हाला पाटलांनी पाठवलं आहे, याच व्यक्तीला मतदान करा. परंतु तसं काहीच नाही. पैसे घेवून काही तरूण हे काम करत आहेत. बहुतेक त्यांना चिरीमिरी दिली असावी, अशी टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलीय.

Video : पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल; ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी असं वक्तव्य का केलं?

मराठ्यांच्या जीवावर काही पैदाशी मोठ्या व्हायचं बघत आहेत. काही पैदाशी तशा सुद्धा आहेत. काहीजण मी माझ्या समाजासाठी काम करत आहे. त्यामुळं माझं नाव बदनाम करण्यासाठी देखील तसं करत असतील. जे जे तुमच्याकडे कोणी आले असतील, माझ्या नावाने निरोप दिला असेल त्यांना माघारी बोलवा. त्यांच्या दोन दोन लावा, असं आक्रमक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. विधानसभा निवडणूकीत मतं मिळवण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला जातोय, तर त्याला बळी पडू नका असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube