‘हिंदू-मुस्लिम हे उद्योग फक्त भाजपचेच मंत्री करू शकतात, राणेंनी बोलतांना भान ठेवावं…’, थोरातांनी सुनावलं
Balasaheb Thorat : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एका कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. केरळ हे मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळे राहुल गांधींची (Rahul Gandhi) बहीण तिथे निवडून येते, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक खासदार झालेत, असं राणे म्हणाले. दरम्यान, राणेंच्या या वक्तव्यावर आता कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाष्य केलं.
फ्रूट पल्प आणि कोळशाचा बॉक्स; पुण्यात सव्वा कोटीची बनावट दारू आली कशी ?
नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या सहकाऱ्याला समजूत द्यावी, ही भाषा, हे वर्तन योग्य नाही. मंत्र्यांनी आपल्या पदाचे ग्रहण करतांना शपथ घेतली आहे, याची तरी आठवण ठेवावी, असं थोरात म्हणाले.
केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने…
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 30, 2024
बाळासाहेब थोरात यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू-मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक रित्या बोलतांना, वागताना भान बाळगले पाहिजे, पण नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत!
वीणा अन् वनिता झाल्या सख्ख्या शेजारी! ‘या’ चित्रपटात शेजारधर्म निभावताना दिसणार
पुढं थोरात यांनी लिहिलं की, जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे समीकरण भाजपमध्ये असल्याने मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. पण, मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या सहकाऱ्याला समजूत द्यावी, ही भाषा, हे वर्तन योग्य नाही. मंत्र्यांनी आपल्या पदाचे ग्रहण करतांना शपथ घेतली आहे, याची तरी आठवण ठेवावी आणि समाजात तेढ वाढणार नाही, असं वर्तन करू नये, असं थोरात म्हणाले.
राणेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का?
देशाची एकता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना मत देणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाने स्पष्ट करावे, असं अतुल लोंढे म्हणाले.