चिंचवडमध्ये वरिष्ठ नेते तोडगा काढणार; नाना काटे शांत राहणार? शंकर जगतापांनी स्पष्टच सांगितलं
BJP Announces Shankar Jagtap Candidate From Chinchwad : भारतीय जनता पार्टीने (BJP) काल 99 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलीय. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. मागील काही दिवसांपासून चिंचवड विधानसभेचे उमेदवार कोण असणार? अशा चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागलाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना भाजपने विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.
आमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची धुसफूस नव्हती. कुटुंबात कलह आहे, असा जगताप कुटुंबियांबद्दल फेक नरेटिव्ह तयार करणं विरोधकांचं काम होतं. निश्चितच ते यशस्वी झालेलं (Assembly Election) नाहीये. काल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून उमेदवारी दिलीय. ज्या प्रकारे अश्विनी जगताप या लक्ष्मण भाऊ यांच्या पाठिशी उभी होत्या, त्याचप्रमाणे या पुढील काळात त्या माझ्या पाठीमागे उभ्या राहणार आहेत, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केलाय. पावलोपावली माझ्यासह हजारो कार्यकर्त्यांना लक्ष्मण भाऊंची आठवण येते.
मोठी बातमी! काँग्रेसच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ; उद्धव ठाकरेंचा ‘प्लॅन बी’ काय?
नाना काटे बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना शंकर जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष योगेश बहल यांच्यासोबत समन्वयाची बैठक झालेली आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते एकत्र बैठक घेवून यावर निश्चित तोडगा काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. नाना काटे यांच्यासोबत देखील बोलणं होतंच असतं. परंतु त्यांचा शुभेच्छांचा फोन आलेला नाही, असं शंकर जगताप म्हणाले आहेत.
फडणवीसांच्या बंगल्यावर नाराजांचा ‘जनसागर’; उमेदवारी रद्द करण्यासाठी ‘आई’ ची धावाधाव
अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिलंय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली आठवण स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांची आली, अशी प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी दिलीय. पक्षश्रेष्ठींमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत दादा पाटील, मुरलीधर मोहोळ या सर्वांची आठवण आली. ज्या पद्धतीने मी मागील 10 वर्ष पक्षात काम केलं. पक्ष संघटन करण्याचं काम केलं. पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या जोरावर जो काही विजय आणला. या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं शंकर जगताप म्हणाले आहेत.