कराडने विचारलं रोहित कुठंय? आ. धसांनी थेट सगळचं सांगितलं

कराडने विचारलं रोहित कुठंय? आ. धसांनी थेट सगळचं सांगितलं

Suresh Dhas : सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) मंगळवारी मोठा झटका बसला. केज न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तसेच मकोकाही लावण्यात आला. न्यायालयातील सुनावणीनंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. रुग्णालयात त्याची ईसीजी तपासणी करण्यात आली. यानंतर त्याला पुन्हा बीड कारागृहात नेण्यात आलं. कराड रुग्णालयातून बाहेर येताच त्याने रोहित कुठंय? असा प्रश्न केला होता. त्यानंतर हा रोहित नेमका कोण याची चर्चा सुरू झाली. याचं उत्तर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी दिलं.

सुरेश धस यांनी माध्मांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना वाल्मिक कराडने प्रश्न केलेला रोहित कुठंय याबाबत विचारलं. हा रोहित कोण आहे असेही विचारले. यावर धस म्हणाले, रोहित हा त्याच्या हाताखालचा माणूस असेल असं मला वाटतं. रोहित कांबळे म्हणून कुणीतरी असेल. वाल्मिक कराडला काही मदत वगैरे लागत असेल म्हणून त्याने त्याचं नाव घेतलं असावं असा खुलास आमदार धस यांनी केला.

मोठी बातमी! बीड जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारिणीच बरखास्त; निर्णयामागचं कारण काय?

संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण घडलं त्याच्या दोन दिवस आधी सुरेश धस वाल्मिक कराड यांना येऊन भेटले असा दावा कराडच्या कुटुंबियांनी केला आहे असे विचारले असता धस म्हणाले, वाल्मिक कराडला मी काही भेटलेलो नाही. माझं वाल्मिक कराडबरोबर वाईट काय होतं? पण तो या पद्धतीने वागायला लागल्यानंतरही त्याचं मी समर्थन करायचं का? दोस्त आहे मैत्री आहे म्हणून अशा पद्धतीनं वागल्यानंतर त्यांच्या बरोबर राहायचं का? असे सवाल धस यांनी केले.

वाल्मिक कराडवर मकोका दाखल केल्यानंतर त्याच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे. यावरही धस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आपला माणूस जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ बीड परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य आहे असा सवाल आमदार सुरेश धस यांनी विचारला.

कराडला मकोका अन् परळी बंद

खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला काल न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तसेच मकोका अंतर्गत कारवाई देखील केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला जातोय. कराडवर मकोका लावण्यात (Santosh Deshmukh Case) आला असून त्याच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. यानंतर कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. बीड शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केले. वाल्मिक कराडची आई आणि पत्नी देखील या आंदोलनात सहभागी होत्या.

वाल्मिक कराडच्या समर्थकांची बैठक; परळीत पडद्यामागील घडामोडींना वेग

follow us
  • fb
  • instagram
  • youtube