पत्रकाराने चुकीचं नाव घेताच फडणवीसांनी थांबवलं अन् म्हणाले, ‘देवेंदर नही, देवेंद्र…’
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे त्यांच्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. अनेकदा पत्रकारांच्या अडणचीच्या प्रश्नांनाही ते सडेतोड तर कधी मिश्किलपणे उत्तर देतात. त्यांच्या याच स्वभावाची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत पत्रकाराने त्याचं नाव चुकीचं घेतल्यानं फडणवीसांनी देवेंदर नही, देवेंद्र, असं सांगत पत्रकाराची चुक दुरूस्त केली.
जामखेडच्या कुसडगाव येथील SRPF प्रशिक्षण केंद्राच्या गेटवर राडा, रोहित पवारांचा ठिय्या आंदोलन
देवेंद्र फडणवीस यांनी आज इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये मुलाखत दिली. या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं. मात्र, मुलाखतीच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना पत्रकाराने त्यांचा ‘देवेंद्र’ ऐवजी ‘देवेंदर भाई’ असा उल्लेख केला. पत्रकाराचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच फडणवीस यांनी त्यांना हटकलं आणि चूक लक्षात आणून दिली. एक रिक्वेस्ट करता हू.. देवेंदर नही, देवेंद्र… शुद्ध मराठी आदमी हू भय्या, असं फडणवीसांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
एक आमदार असलेल्या पक्षालाही CM व्हायला आवडेल…; अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे भाष्य
मराठी अभिमान म्हणून का? असा प्रतिप्रश्न पत्रकाराने विचारताच फडणवीसांनी आम्ही पूर्ण देशाला एक मानतो. फक्त नावात थोडी चूक झाली म्हणून सांगतोय, असं ते म्हणाले
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं होतं. मुख्यमंत्री व्हायची माझी इच्छा आहे, असं ते म्हणाले होते. त्याविषयी विचारलं असता फडणवीसांनी एक आमदार असलेल्या पक्षालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी मोजकी प्रतिक्रिया दिली.
काही तडजोडी आवडत नाहीत तरीही…
लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसला. त्यावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने अजित पवार महायुतीत नको, अशी भूमिका घेतली होती. त्यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. काही तडजोडी तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून आवडत नसल्या तरी कराव्याच लागतात, असं फडणवीस म्हणाले. मात्र, आता कोर्स करेक्नशची वेळ नाहीये. आणि तसे करणंही योग्य नाही. जो कोर्स चालू आहे, त्याच कोर्सला सामोरं जावं लागले, असं ते म्हणाले.
पुढं ते म्हणाले, लोकसभेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली. त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली. पण विधानसभेत मात्र, हे होणार नाही. विधानसभेत ते नक्कीच मतं आमच्याकडे वळवू शकतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.