Maharashtra CM : ‘आमचा मान कसा राखायचा हे दिल्लीवाल्यांनी ठरवावं’, केसरकरांचा इशारा

  • Written By: Published:
Maharashtra CM :  ‘आमचा मान कसा राखायचा हे दिल्लीवाल्यांनी ठरवावं’, केसरकरांचा इशारा

Deepak Kesarkar : विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) प्रचंड बहुमत मिळाले, मात्र निकाल लागून दहा दिवस झाले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदी (Chief Minister) कोण विराजमान होणार हे ठरत नाही. मोदी- शहा मुख्यमंत्र्यांबाबत जो निर्णय घेतील तो मान्य केला जाईल, असे एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सांगितलं. मात्र, शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी अडून बसले. अशात दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मोठं विधान केलं.

कारवाई होणार, पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ नेत्यांची वाढणार डोकेदुखी 

आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सिद्ध करून दाखवलं, आता त्यांचा मान कशा रीतीने राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, असं सूचक विधान केसरकर यांनी केलं.

केसरकर म्हणाले की, महायुतीचा शपथविधी सोहळा 5 तारखेला होणार आहे. मात्र अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. म्हणूनच मी ही पत्रकार परिषद घेत आहे. एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यात त्यांची काही भूमिका आहे. भाजपची निवड प्रक्रिया कधी व्हावी हा भाजपचा विषय आहे. आज आमची कोणतीही बैठक नव्हती. तरीही बैठक रद्द झाल्याच्या बातम्या येत आहेत,असं ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजिबात नाराज नाहीत,असंही ते म्हणाले.

शपथविधीच्या सोहळ्यासाठी जागेची पाहणी करायला फक्त भाजप नेते गेले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जागा ठरवण्यासाठी सांगितलं नसल्याचं बोललं जातंय. यावर केसरकर म्हणाले की, मी फडणवीस यांना मेसेज पाठवला की, महायुतीची सत्ता येत आहे. पण, मैदानाची पाहणी करायला एकच पक्ष जातात. त्यामुळं लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. आम्हाला कळवलं असतं तर आम्हीही आलो असतो. पण लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. आम्ही 100% एकत्र आहोत, असं केसरकर म्हणाले.

चंद्रचूड यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला; पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र 

5 तारखेला शपथविधी…
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीने 235 जागा जिंकल्या आहेत. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित झाल्याची माहिती दिली. महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. 5 डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदानवर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याच बावनकुळे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube