ज्येष्ठ नेते आहात किमान जनतेची दिशाभूल करू नका; निवडणुकीचा आकडेवारीवरून फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

  • Written By: Published:
ज्येष्ठ नेते आहात किमान जनतेची दिशाभूल करू नका; निवडणुकीचा आकडेवारीवरून फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Devendra Fadanvis On Sharad Pawar : राज्यातील निवडणुकीत पक्षांना मिळालेली मते आणि मिळालेल्या जागांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शंका उपस्थित केलीय. मोठ्या राज्यात भाजपला (BJP सत्ता मिळत आहे. तर लहान राज्यात विरोधकांनी सत्ता दिली जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी कोल्हापूर येथे केली. या निवडणुकीतील आकडे आश्चर्यकारक आहे. पण ठोस अशी माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी पुष्टीही पवार यांनी केलीय. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ममता बॅनर्जी या प्रभावी नेत्या; इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी शरद पवारांचाही पाठिंबा?

एक चित्र दिसते आहे की तेथे मोठे राज्य तेथे भाजप आहे. छोटे राज्यात दुसरे पक्ष सत्तेत असे तरी सध्या दिसत आहे. काँग्रेस पक्षाला 80 लाख मते पडली आणि त्यांचे फक्त 16 आमदार निवडून आले. तर शिंदे गटाला 79 लाख मते मिळाली आहेत, त्यांचे 57 आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही काँग्रेसपेक्षा 41 आमदार अधिक निवडून आलेत. तर शरद पवार गटाच्या पक्षाला मते 72 लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त दहा. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 58लाख मतदान मिळालेत. पण त्यांचे 41 आमदार निवडून आलेत. या आकड्यांचे आश्चर्य वाटते, असे शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरून शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

इंडिया आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे जाणार ? ‘सपा’चाही सपोर्ट

शरद पवारसाहेब आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. लोकसभेला भाजपाला 1 कोटी 49 लाख 13 हजार 914 मते मिळाली होती आणि जागा 9 मिळाल्या होत्या. पण काँग्रेसला 96 लाख 41 हजार 856 आणि जागा 13 मिळाल्या. शिवसेनेला 73 लाख 77 हजार 674 मतं आणि 7 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58 लाख 51 हजार 166 मते मिळाली आणि 8 जागा मिळाल्या. तर 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87 लाख 92 हजार 237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल!
तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असे फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube