महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट्र कारभार, जाहिराती जोरदार; शरद पवार गटाचा हल्लाबोल

महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट्र कारभार, जाहिराती जोरदार; शरद पवार गटाचा हल्लाबोल

Jayant Patil attack on Mahayuti : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. सरकारी योजना, सरकारचं काम या गोष्टींची जनतेला माहिती व्हावी यासाठी प्रचार प्रसिद्धीही आलीच. त्याचाच एक भाग म्हणून महायुती सरकारने (Mahayuti) जाहिरातींसाठी दीड हजार कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे.

Satyashil Sherkar : पुण्यात राष्ट्रवादीच्या मुलाखतीत पोहोचला काँग्रेसचा नेता; चर्चांना उधाण… 

आतापर्यंत या सरकारने सुमारे दीड हजार कोटी रुपये केवळ प्रसिद्धीसाठी खर्च केले आहेत. महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार आणि जाहिराती जोरदार असा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे.

रविकांत तुपकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तुपकर मशाल हाती घेणार?, पडद्यामागे काय घडतंय? 

जयंत पाटील यांनी X अकाऊंटवर पोस्ट करत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी लिहिलं की, फक्त काही दिवसांपकरिता डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारने 90 कोटी रुपयांचे टेंडर काडलेले आहे. आतापर्यंत या सरकारने सुमारे दीड हजार कोटी रुपये केवळ प्रसिद्धीसाठी खर्च केले आहेत. या दीड हजार कोटी रुपयांमध्ये माझ्या शेतकऱ्यांना मोठी मदत देता आली असती, माझ्या तरुणांचा कौशल्य विकास करता आला असता, माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश मिळाले असते. ग्रामीण आणि आदिवासी भागातील किती रस्ते झाले असते. विचार करा, या पैशांमध्ये किती लाडक्या बहिणींना मदत झाली असती, पण शेवटी महायुती सरकार म्हणजे, भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, महायुती सरकार म्हणजे, भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला आता महायुतीकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube