मुंबई : ज्येष्ठ लेखक, माध्यमतज्ज्ञ, संपादक आणि रंगकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या 84 व्या वर्षी यांचे मुंबईत निधन झालं. विश्वास मेहेंदळे यांनी पुणे आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली. त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक होते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ते नाट्यकलावंत आहेत […]
पुणे : राज्यातील राजकारणात पुण्यातील एका घटनेनं चर्चांना उधान आलंय. पुण्यामध्ये एका कार्यक्रमात कॉंग्रेसचे मातब्बर आणि निष्ठावंत नेते विश्वजीत कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचं गाडीतून आले, असं असतानाही त्यांच्याकडं कानाडोळा करुन विश्वजीत कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. याच्यामागचं नक्की काय कारण असावं? […]
मुंबई : शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचं तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेळापत्रकानुसार, यंदा 18 मार्च ते 23 जुलै या कालावधीत ‘सीईटी’ परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर अभियांत्रिकीसाठी एमएच-सीईटी परीक्षा 9 ते 20 मे दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. हे सीईटी परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक आहे. अभियांत्रिकी, कृषी, बी. फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या […]
पुणे : तेलंगणा राज्यामध्ये सुरू असलेल्या हिंद केसरी किताबाच्या अंतिम लढतीत पुण्याच्या अभिजीत कटकेनं बाजी मारलीय. अभिजीतनं हरियाणाच्या सोमवीर याचा 5-0 गुणांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवलाय. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अभिजित कटकेनं यापूर्वी 2017 मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. अभिजीतनं जिंकलेला हिंदकेसरी किताब महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवणारी आणि तेवढीच अभिमानाची गोष्ट आहे. […]
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृत सागर दूध संघाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला धूळ चारत माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनलने विजय मिळविला. त्यांच्या पॅनलने 15 पैकी 13 जागांवर विजय मिळविला. मागील वर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना व राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना चाळीस वर्षांची सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे अमृत सागर […]
पुणे : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये अशोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अशोक सराफ यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेमध्ये असती, तर ते आज मुख्यमंत्री असते. ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो […]