Rajya Sabha Election : चव्हाणांमुळे काँग्रेसचं गणित बिघडलंच; भाजप राज्यसभेसाठी देणार चौथा उमेदवार?
Rajya Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महाविकास (Lok Sabha Election 2024) आघाडीला जोरदार धक्के बसले. शिवसेना आधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही पक्षांची जशी वाताहत झाली तशी काँग्रेसची झाली नव्हती. मात्र, आता काँग्रेसही फुटली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण. या फाटाफुटीने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष खिळखिळे झाले आहेत. अशा परिस्थितीतच आता महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha Election) सामोरे जावे लागणार आहे. आता तर अशी माहिती मिळत आहे भाजप चौथा उमेदवार देणार आहे. जर खरंच असं घडलं तर काँग्रेसच्या (Congress) अडचणी वाढणार आहेत.
Ashok Chavan: अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम! पटोलेंना लिहिलेलं पत्र Letsupp च्या हाती!
शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, गोवर्धन शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. अशोक चव्हाण यांनी नुकतााच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद घटली आहे. सध्या विधानसभेत 284 संख्याबळ आहे. त्यामुळे एकूण आमदार भागिले एकूण उमेदवार अधिक एक या सूत्रानुसार 40 मतांचा कोटा होईल. त्यानुसार भाजपला 3 जागा, शिंदे गट 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 1 आणि काँग्रेसला 1 जागा मिळेल.
काँग्रेसचे संख्याबळ विचारात घेतले तर सध्या काँग्रेसकडे 43 आमदार आहेत. परंतु आता अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने गणित बिघडणार आहे. संख्याबळ कमी होणार आहे. अशातच जर भाजपाने चौथा उमेदवार रिंगणात उतरवला तर काँग्रेसची मोठी अडचण होणार आहे. जर राजकीय गणित जुळून आलं तर भाजप चौथा उमेदवार देण्यासही मागे पुढे पाहणार नाही. निवडणुकीत काहीही होऊ शकते असा विचार केला तर भाजपाचा चौथा उमेदवारही रिंगणात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
BJP RajyaSabha Candidate : भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर, कोणाला मिळाली संधी?
या वर्षी राज्यसभेचे 68 सदस्य निवृत्त होणार आहेत. यापैकी 3 खासदारांचा कार्यकाळ 27 जानेवारीला संपला आहे, तर इतर 65 सदस्य निवृत्त व्हायचे आहेत. या 65 सदस्यांपैकी 55 सदस्य 23 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार आहेत. तसेच, 7 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2 ते 3 एप्रिल दरम्यान पूर्ण होणार असून 2 सदस्य मे महिन्यात निवृत्त होणार आहेत. या निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये भाजपच्या खासदारांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा भाजपच्या 32 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. तर काँग्रेसचे 11 खासदार निवृत्त होणार आहेत. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या 4 आणि बीआरएसच्या 3 खासदारांचा समावेश आहे.
अशोक चव्हाणांना राज्यसभेचं तिकीट ?
भाजपाने अन्य राज्यांतील राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र महाराष्ट्रातील यादी अद्याप वेटिंगवरच आहे. याचेही कारण अशोक चव्हाणच असल्याचे सांगितले जात आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीच अगदी घाईघाईत त्यांचा भाजप प्रवेश करवून घेतला जात आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण कदाचित उद्याच उमेदवारी अर्ज भरतील अशी शक्यता आहे.