शरद पवारांचं आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
Laxman Hake On Sharad Pawar : सर्वपक्षीय बैठक बोलावून ओबीसी आरक्षणाबाबत तोडगा काढा, शरद पवारांचं (Sharad Pawar) हे आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण असल्याची बोचरी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलीयं. दरम्यान, मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केलीयं. सर्वपक्षीय बैठक बोलवण्याबाबतचा सल्ला यावेळी शरद पवार यांनी दिलायं. त्यावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी पवार यांच्यावर टीका केलीयं.
Anuradha Paudwal : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
लक्ष्मण हाके म्हणाले, सर्वपक्षीय बैठक बोलावून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा, असं शरद पवार यांनी आवाहन केलंय. शरद पवार यांचं हे आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण आहे. अनेक दिवसांपासून मनोज जरांगे नावाचा भस्मासूर कोणी निर्माण केलायं, याचं उत्तर शरद पवार यांनी द्यावं, आता पूलाखाली एवढं पाणी वाहून गेल्यानंतर असं आवाहन करणे म्हणजे म्हातारपणी शृंगार करणं होयं, या शब्दांत लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केलीयं. तसेच मागील अनेक दिवसांपासून राज्यातील बीड शहर जळंतय, त्या वातावरणाचा फायदा घेऊन माणसं निवडून आणली आहेत. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपली राजकीय पोळी शेकली असल्याचीही टीका लक्ष्मण हाके यांनी केलीयं.
काय म्हणाले शरद पवार?
मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांनी योग्य वाटतील त्या लोकांना बोलवावे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू, आमची भूमिका सहकार्याची राहील, असे त्यांना सुचवले आहे. मुख्यमंत्री याबाबतची बैठक बोलवतील, त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या पक्षांच्या प्रमुखांना बोलवावे. त्याशिवाय, हा प्रश्न मांडण्याच्याबाबत प्रकर्षाने ज्यांनी कष्ट घेतले त्या मनोज जरांगे पाटील यांनाही बैठकीला निमंत्रित करावे. दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाचा, त्यांचे नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील, त्यांनाही बैठकीला निमंत्रित करावं. त्या संयुक्त बैठकीत आपण चर्चा करुन यामधून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी, अशी भूमिका शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत मांडलीयं.