‘…तर सगळं विकून चंद्रावर रहायला जा’; ‘आम्हाला कुणबी नको’ म्हणणाऱ्यांना जरांगेंनी सुनावलं

‘…तर सगळं विकून चंद्रावर रहायला जा’; ‘आम्हाला कुणबी नको’ म्हणणाऱ्यांना जरांगेंनी सुनावलं

Maratha Reservation : ज्याला कुणबी शब्दाची अॅलर्जी त्याने सगळं विकून चंद्रावर रहायला जावं, या शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange patil) यांनी सुनावलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असतानाच काही मराठा बांधवांकडून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, असा सूर लावल्याचं पाहायला मिळतयं. ज्या मराठा बांधवांकडून असा सूर लावण्यात येतोयं त्यांना मनोज जरांगे यांनी कडक शब्दांत सुनावलं आहे. जरांगे पाटील पुण्यातील दौंडमधील वरंवडीतील आयोजित सभेत बोलत होते.

Priyanshu Painyuli: प्रियांशुने मेजर राम मेहताच्या पिप्पातील भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात केलं घर

मनोज जरांगे म्हणाले, काही लोकं म्हणतात आम्हाला कुणबी नको, कुणबी म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांचं प्रमाणपत्र कुणबी म्हणून घ्यायला काय अडचण? वाड्याला आधी वाडा म्हणायचे आता हाऊस म्हणतात .चप्पलीला पायथान म्हणायचे आता चप्पल म्हणतात, हॉटेलला आता रेस्टॉरंट म्हणतात, ज्याला कुणबी शब्दाची अॅलर्जी त्याने सगळं विकून चंद्रावर रहायला जावं, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

तसेच आपल्या आई-बापांनी कुणबी म्हणून संपत्ती सांभाळून ठेवली त्याला काय लाजायचं? मराठा समाजाची दोन अंग आहेत,एक अंग क्षत्रिय अन् दुसरं म्हणजे शेती करणारे… त्याच्यात लाज काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

‘..नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते’; चव्हाणांचं कदमांना तिखट उत्तर

मराठ्यांच्या मुलांचं, गोरगरीबांचं कल्याण व्हायला लागलं तर काही लोकं काहीतरी सापडून आणणार आहेत, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात यायचं नसेल तर नका येऊ पण गोरगरीबांच्या अन्नात माती कालवू नका, असंही ते म्हणाले आहेत. सामान्य मराठ्यांच्या नादी लागलात तर सोडणार नाही, या कडक शब्दांत इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

Lalit Patil प्रकरणी निलंबित डॉक्टरांचा धक्कादायक दावा; म्हणाले डीनच्या आदेशानेच…

दरम्यान, आमरण उपोषण सोडताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. राज्यभरात आत्तापर्यंत मराठा कुणबी असल्याच्या लाखो नोंदी आढळून आल्या आहेत. त्यानूसार सरकारला मराठा आरक्षणासाठी कायदा पारित करण्यासाठी नोंदीचा आधार पुरेसा असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. या नोंदीच्या आधारे सरकार मराठा आरक्षणाचा कायदा येत्या 24 डिसेंबरला पारित करणार असल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube