‘पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही देतील’; आव्हाडांचा अजितदादा गटावर हल्लाबोल
Jitendra Awahad On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही देतील, अशी खोचक टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षांना चारचाकी देणार असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी अजित पवार गटाकडून गाड्यांची पाहणी करण्यात आली आहे. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी हल्लाबोल चढवला आहे.
‘काम न करता श्रेय घेणाऱ्यांनी जरा लाज बाळगा’; कर्डिलेंचा उल्लेख टाळत तनपुरेंचा हल्लाबोल
जितेंद्र आव्हाड म्हणाले, प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचे आहे, म्हणजे ते पळून जाणार नाहीत. अजित पवार गटाला पळणाऱ्यांची खूप भीती आहे. निवडणूक जाहीर करा, मग उद्या बघा किती पळापळ होईल. अजित पवार गट ४० काय ४०० गाड्यांचं वाटप करतील. निवडणूक जाहीर झाल्यावर कोणीही पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी देतील , अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
मोदी सरकार स्वस्तात देणार ‘भारत तांदूळ’ : निवडणुकीपूर्वी महागाईवर मात करण्यासाठी पाऊल
लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे. महायुतीकडून लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. अशातच आता अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांसाठी थेट वाहन वाटप करण्यात येणार आहे.
भुजबळांच्या समान जागा वाटपाची हवा तटकरेंनीच काढली, म्हणाले आमचा अंतिम निर्णय…
अजित पवार गटाने दोन वाहनांचे टेस्टींग केलं. अजित पवार गटाकडून आज टेस्ट ड्राईव्हसाठी दोन प्रकारच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये दोन प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, दमदाटी करणं हाच अजित पवारांचा स्वभाव दोष आहे. शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ए गप्पे बस रे, उठू नको असं अजित पवार म्हणत होते. पण तुम्ही घरी नाहीत तर सार्वजनिक जीवनात आहात. त्यामुळं अशी विधानं करणं योग्य नसल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.