‘ते’ आंदोलन म्हणजे घरचं सत्यनारायण नव्हतं; दाखल गुन्हे मागे घ्या, राज ठाकरेंची मागणी

‘ते’ आंदोलन म्हणजे घरचं सत्यनारायण नव्हतं; दाखल गुन्हे मागे घ्या, राज ठाकरेंची मागणी

Raj Thackeray On cases against toll Plaza protesters : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोल नाका आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. मनसे आंदोलकांनी केलेली आंदोलने लोकांसाठी होती. आज मला वाटतं सगळेच जन खुश असतील. इतकी वर्ष आपल्यावर जी काय टोलधाड (toll Plaza protest) पडली होती, त्याला डकैती म्हणता येईल. किती पैसे आले? किती जमा झाले, कोणाकडे आले, काय झालं. कशाचाच कशाला पत्ता नव्हता, अशी टीका देखील राज ठाकरे यांनी केलीय.

इतक्या वर्षांच्या आमच्या आंदोलनाला हे यश मिळालं आहे. याबद्दल राज ठाकरे यांनी सर्व मनसैनिकांचं अभिनंदन देखील केलीय. तेव्हाही केलं अन् आताही करतोय, हे सगळं मनसे (MNS) सैनिकांमुळे शक्य झाल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. टोलनाक्यांवर आंदोलन केल्याप्रकरणी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. यावरून राज ठाकरे यांनी मनसे आंदोलकांवर टोलनाक्यासंदर्भात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची देखील विनंती केलीय.

Raj Thackray : विधानसभा जिंकू अन् सत्ता आणू…राज ठाकरेंचा निर्धार; विरोधकांना फटकारले

दरम्यान राज ठाकरे यांनी विनयभंग केल्यानंतर आरोपींना जामीन मिळतो तरी कसा? असा संतप्त सवाल देखील विचारला आहे. विनयभंग प्रकरण कुटुंबीय आणि पोलीस अधिकारी भेट झालीय. माझं आताच पोलिसांशी बोलणं झालंय, मी त्यांना हेच सांगितलं बदलापूरसारखं सगळ्या गोष्टी तुम्ही अंगावर घेऊ नका, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

Nana Patole : पाठीत वार काय करता, हिंमत असेल तर समोरा-समोर लढा; पटोलेंचा थेट ‘नावं’ घेत हल्ला

तो कोणत्या पक्षाचा आहे, हे महत्वाचे नसून पक्षाची ही कधी भूमिका नसते. कोणतीही माणसाची अशी विकृती पक्ष म्हणून पंखा घालणार, असू तर मग बघायलाच नको. कोणत्याही पक्षाचा माणूस असू दे, अशा प्रकारचे कृत्य करताना कोणीही त्याला पंखाखाली घालू नये. अशा प्रकारची विनयभंगाची केस झाल्यानंतर अशा लोकांना जमीन मिळतो? कसा हेच मला कळत नाही. अशा लोकांना कोर्ट जामीन देत कसं? असा सवाल देखील राज ठाकरेंनी केलाय. पीडित मुलीचा जबाब परत घ्या. जो कोणी आहे त्याला अरेस्ट करा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube