आपल्याकडे शिंदेंच्या खासदाराचे परदेशातील ‘ते’ व्हिडिओ, त्यातून खरं चरित्र समोर येणार; राऊतांचा इशारा
Sanjay Raut On Shinde Group : ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर टीका केली जाते. आताही खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गटावर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मनी लाँडरिंग कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा राऊतांनी केली. यावेळी त्यांनी माझ्याकडे एका खासदाराचा भयंकर असा व्हिडिओ आला, त्यातून शिंदे गॅंगचं खरं चरित्र समोर येईल, असं राऊत म्हणाले.
‘अभिषेक माझा गौरव’ लेकाला पुरस्कार मिळाल्यानंतर बिग बींनी केले तोंडभरून कौतुक
संजय राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना त्यांनी शिंदे गटावर टीका केली. यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, माझ्याकडे महाराष्ट्रातील एका खासदाराचा भयंकर असा व्हिडिओ आला आहे. ते शिंदे गटाचे खासदार आहेत. ते सतत परदेशात जात असतात. ते परदेशात गेले होते. ते वारंवार परदेशात का जातात? हे सगळं आता हळूहळू समोर येत आहे. यांचा खर्च कोण करतं? हेही समोर येईल. शिंदे गँगचे खरे चरित्र बाहेर आल्यानंतर एकेदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा स्वतःच जाहीर करतील की शिंदे गँगशी आमचा काहीही संबंध नाही. आमची चूक झाली, असं राऊत म्हणाले.
Navra Mazha Navsacha 2: सचिन पिळगावकरच्या ‘या’ सिनेमाचा दुसरा भाग लवकरच येणार
पीएमएलए कायद्याचा गैरवापर
पीएमएलए कायद्याचा गैरवापर होत आहे. विरोधी पक्षातील लोकांना अटक करून तुरुंगात टाकलं जातंय. मी स्वतः या कायद्याचा बळी ठरलो. मला काही दिवस तुरुंगात टाकण्यात आले. अनिल देशमुख, नवाब मलिक यांनाही तुरुंगात टाकलं होतं. आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई सुरू आहे. आपच्या अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकले आहे. पीएमएलए कायद्याचा भाजपकडून गैरवापर होत आहे. गुन्हेगारी स्वरुपाचा पैसा किंवा त्यातून निर्माण झालेला पैसा कोणी स्वीकारला असेल, तर त्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संबंधित व्यक्तीला अटक करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारीच पैसा स्विकारलेला आहे. यासंदर्भात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे स्टेटमेंट आहे. गणपत गायकवाड म्हणतात, एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोट्यावधी रुपये आहेत. गणपत गायकवाड यांच्या आरोपानुसार त्याचा आता शोध घेतला पाहिजे. आमच्या माहितीनुसार ही रक्कम 100 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.