लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात जमा होणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता….

Mukhyamantri Ladki Bahin Yojana February Month Installment : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) खुशखबर आहे. त्यांच्या खात्यात आजपासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात झालीय. महाराष्ट्रातील (Mahayuti) महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी महायुती सरकारने ही योजना सुरू केलीय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून देण्यास सुरूवात झालीय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारी रोजी माहिती दिली होती की, त्यांनी फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केली होती. या योजनेचे पैसे पुढील आठवड्यात मिळतील, असं अजित पवार म्हणाले होते. पण आठवडा उलटूनही महिलांना पैसे मिळायला सुरुवात झाली नव्हती. यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. अखेर आजपासून फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवला.
जानेवारी महिन्यामध्ये 2 कोटी 41 खाख महिलांना लाडकी बहीण योजनेतंर्गत पैसे मिळाली होती. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महिलांची संख्या सुमारे 9 लाखांनी कमी झाल्याचं सांगण्यात आलं. फेब्रुवारी महीना संपत आला तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी मिळणार, असा सवाल महिला विचारत होत्या. मात्र आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलीय.
शिंदेंना मोठा धक्का; भाजपने दिल्लीतून सूत्रं फिरवली, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
या महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात आज जमा होण्याची शक्यता आहे. नव्या निकषानुसार, लाडक्या बहिणींच्या खात्यत हे पैसे जमा होऊ शकतात. काही तांत्रिक कारणांमुळे आत्तापर्यंत हे पैसे जमा झाले नव्हते. मात्र आता, आज हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.
काही तांत्रिक समस्येमुळे पेमेंटमध्ये विलंब झाल्याचेही विभागाने खात्याला कळवले आहे. फेब्रुवारी महिना संपायला चार दिवस शिल्लक होते. अशा परिस्थितीत महिला योजनेतील पैशाची वाट पाहत होत्या. आज अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. आतापर्यंत सात महिन्यांचे पैसे त्यांना मिळाले आहे.