काका-पुतण्यांच्या आमदारांवर नार्वेकर मेहेरबान; दोन्ही गटाचे आमदार पात्रच ठरवले…
Ncp Disqualification Mla : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्र आमदार प्रकरणाचा (Ncp Disqualification Mla) निकाल समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला आहे. असून अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटाच्या आमदारांना राहुल नार्वेकरांकडून दिलासा मिळाला आहे. दोन्ही गटाचे आमदार राहुल नार्वेकरांनी पात्र ठरवलेले आहेत. यामध्ये दोन्ही गटाच्या एकूण 52 आमदारांना दिलासा मिळाला आहे.
Gautam Gambhir : दिग्गज असो की सिनियर, कुणालाच सोडलं नाही; क्रिकेट ‘हिस्ट्री’मधील गंभीरचे 5 मोठे वाद
अजित पवारांकडून एकूण पाच याचिका दाखल करण्यात आल्या होत्या या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी निकाल जाहीर केला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या तीनही याचिका राहुल नार्वेकरांनी फेटाळल्या आहे. याउलट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून शरद पवार गटाला सुनावण्यात आलं आहे. शरद पवार गटाने दहाव्या परिशिष्टाचा गैरवापर करु नये.
Electoral Bonds Scheme : इलेक्टोरल बॉण्ड नक्की काय? कधी आणि का सुरू करण्यात आले होते?
तसेच शरद पवार गटाने आमदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नये, पक्षांतर्गत मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही, पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधीमंडळ पक्षाची नाराजी नाही, असं विधानसभा अध्यक्षांनी निरीक्षण नोंदवलं आहे. यासोबतच दहावे परिशिष्ट म्हणजे पक्ष चालवण्याचं शस्त्र नाही. पक्षात लोकशाही असेल याची दक्षता घेतली पाहिजे, दहाव्या सूचीचा वापर आमदारांना शिक्षा करण्यासाठी करु नये, असंही राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे.
निकालामध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘दादा’ अजित पवारचं असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला. म्हणजेच दहाव्या परिशिष्टानूसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलायं. त्यामुळे आता खरी राष्ट्रवादी ही अजित पवार यांचीच असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच आणि पक्षाचं चिन्ह घड्याळ अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल देताना अजित पवार आणि शरद पवार गटाचा एकही आमदार अपात्र ठरवलेला नाही.