बच्चू कडूंची ‘मविआ’त वापसी? भेटीबद्दलचं खरं शरद पवारांनी सांगितलं…

  • Written By: Published:
बच्चू कडूंची ‘मविआ’त वापसी? भेटीबद्दलचं खरं शरद पवारांनी सांगितलं…

Sharad Pawar : प्रहारचे प्रमुख व आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या महायुतीत आहेत. याआधी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर मविआचे (MVA) सरकार पडल्यांतर ते महायुतीसोबत गेले. मात्र, त्यांना कुठलही मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं अनेकदा त्यांनी सरकारविरोधातच आंदोलन केली. दरम्यान, बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट होणार आहे. त्यामुळे कडू महाविकास आघाडीत परत येणार का? अशा चर्चांना उत आला आहे. दरम्यान, यावर आता खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं.

‘देशमुखांच्या शेती प्रदर्शनाला नेहरुंनीही भेट दिली होती’; शरद पवारांकडून आठवणींना उजाळा 

आज शरद पवारांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी
बच्चू कडू महायुती नाराज आहे, त्यांना महाविकास आघाडीत आणण्यासाठी काही प्रयत्न करणार का? या प्रश्नावर बोलतांना पवार म्हणाले, मी बच्चू कडू यांच्या घरी जात आहे, यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. बच्चू कडू यांनी मला चहासाठी बोलावले आहे. म्हणून मी त्यांच्याकडे जात आहे. एका विधानसभेच्या सदस्याने चहासाठी बोलावलं तर एवढी चर्चा करण्याची गरज नाही, असं पवार म्हणाले.

विरोधकांकडे PM पदासाठी चेहराच नाही, अजितदादांच्या टीकेला पवारांचं प्रत्युत्तर, ‘चेहरा नसल्यास काहीही…’ 

भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना अद्याप इंडिय आघाडीत स्थान मिळालं नाही. दरम्यान, आंबेडकरांना इंडिया आघाडीत सामावून घेणार का, या प्रश्नावर बोलतांना पवार म्हणाले की, मला माहित नाही. पण, इंडिया आघाडीच्या बैठकीत मी मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधण्यास सांगितले. आगामी निवडणुका प्रकाश आंबेडरांना सोबत घेऊन लढवाव्यात, त्यांना सोबत घेण्यसााठी प्रयत्न करा असंही सूचवलं. आमची सगळ्यांची इच्छा आहे की, प्रकाश आंबेडकरांनी महाहाविकास आगडाती यावं.

राम मंदिर बांधल्याचा आनंद

मला राम मंदिराचे निमंत्रण मिळालेले नाही. मी अशा कार्यक्रमांना जाणे टाळतो. देवधर्म, पुजा-अर्चा यापासून मी दूस असतो. पण, माझेही काही श्रध्दास्थान आहेत. मी तिथं जातो. पण, याची मी जाहिरात करत नाही. सरकारकडे दुसरा कोणता मुद्दा नाही, त्यामुळं केवळ ते राम मंदिराच्या मुद्दावरून लोकांना आकर्षित करत आहेत, असा टोलाही पवारांनी लगावला.

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पुण्याच्या खडकवासला मतदारसंघातून नाना पाटेकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा आहे. याविषयी विचारले असता पवार म्हणाले की, नाना पाटेकराशी माझी चांगली मैत्री आहे. त्यांच्या निवडणुकीच्या चर्चा मी तुमच्याच तोडून ऐकत आहे. ते निवडणूक लढणार याची मला माहिती नाही, असं पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube