Jitendra Awhad : ‘ठाण्यात गुंडगिरी म्हणता मग, पुण्यात आरत्या होतात का?’ आव्हाडांचा खोचक सवाल
Jitendra Awhad vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. यात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आघाडीवर आहेत. आव्हाड सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आताही त्यांनी अजित पवारांच्या एका वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाण्यात गुंडगिरी आहे असे अजित पवार म्हणतात मग पुण्यात काय (Pune) आरत्या होतात का?, असा खोचक सवाल त्यांनी अजित पवार यांना विचारला आहे.
अजितदादा भाजप अन् शिंदेंना स्वस्थ बसू देणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा दावा
राज्यातील 36 जिल्ह्यांचा विचार केला तर ठाण्यात सर्वाधिक गुन्हेगारी आहे. याचं कारण म्हणजे एकतर ठाण्याची लोकसंख्या खूप जास्त आहे आणि येथे अनधिकृत कामेही होतात. त्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखणं पोलिसांचं काम आहे. राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेण्याचं काम राज्यकर्त्यांचं आहे असे स्पष्ट करत जर कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाई करावी, असे अजित पवार म्हणाले होते.
त्यांच्या याच वक्तव्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. ठाण्यात गुंडगिरी आहे असे अजित पवार म्हणतात. मग पुण्यात काय आरत्या होतात का? पुण्यात जेवढी गुंडगिरी आहे तेवढी मुंबईत सुद्धा नाही. खुलेआम दिवसाढवळ्या कोयते मारले जातात, खून पडतात असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आता आव्हाड यांच्या वक्तव्यावर अजित पवार गटातील नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, त्यात तथ्य असू शकतं
दरम्यान, शरद मोहोळची (Sharad Mohol) दोन दिवसांपूर्वी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मोहोळचा साथीदार म्हणून काम करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतरांनी त्याला संपविले. या सर्व घटनेत शरद मोहोळ गंभीर झाला होता. त्यानंतर त्याला तत्काळ जवळ असणाऱ्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या खुनातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले. यातील आठही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
पकडण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २० वर्ष), नामदेव महीपती कानगुडे, अमित उर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहु शेळके, विनायक संतोष गाव्हणकर, विठ्ठल किसन गांदले यांना दहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.