रेल्वेचं इंजिनपाहून रोहित पवारांना झाली भाजपची आठवण; म्हणाले…

रेल्वेचं इंजिनपाहून रोहित पवारांना झाली भाजपची आठवण; म्हणाले…

Rohit Pawar Twitt :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. शरद पवार गटाकडून रोहित पवार हे सातत्याने आरोप करत आहे. त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. तसेच रोहत पवार हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. नुकतेच रोहित पवारांनी एक ट्विट केले असून या ट्विटच्यामाध्यमातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

https://letsupp.com/maharashtra/thinking-about-the-party-symbol-and-name-and-ajit-dada-again-hit-the-eye-67990.html

रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले की, “लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर… आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते… जसं राजकारणासाठी भाजपने चुकीचा मार्ग निवडलाय… आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र तपासावं लागेल.”

कृषीमंत्री होताच धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी; वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

रोहित पवारांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये एक मोठा ट्रक दिसत असून त्यामागे ट्रॉलीवर एक रेल्वेचं इंजिन आहे. हा ट्रक धीम्या गतीनं एखाद्या घाट रस्त्यावरून जात असल्याचे दिसून येत आहे. या ट्रकच्या मागे काही वाहनं अडकून पडल्याचं चित्र फोटोतून निर्माण झालं आहे. हा फोटो शेअर करत रोहित पवारांनी भारतीय जनता पक्षाबरोबरच शिंदे गट व अजित पवार गटाला टोला लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube