राऊत असा आव आणतात, जणू ते स्वातंत्र्यवीरच, त्यांची टीआरपीसाठी सगळी धडपड; निलम गोऱ्हेंची टीका

Neelam Gorhe on Sanjay Raut : संजय राऊतांनी (Sanjay Raut) नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केलेत. या पुस्तकाचं आज(दि. १७ मे) मुंबईत प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि चित्रपट पटकथालेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं जाणार आहे. दरम्यान, या पुस्तकावर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत (Sanjay Raut) यांची स्वतः बद्दल बोलून टीआरपी वाढवण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
“मी दिल्लीतल्याच घरात बसलोय”; राऊतांनी सांगितला अटकेपूर्वी शाहंना केलेल्या ‘मीड नाईट’ कॉलचा घटनाक्रम
तसेच संजय राऊत असा आव आणत आहेत, जणू ते स्वातंत्रवीरच आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
नीलम गोऱ्हे आज जालना दौऱ्यादरम्यान आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलत होत्या.
राऊतांच्या पुस्तकाविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, संजय राऊतांनी त्यांच्या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केल्याचा दावा केलाय. ते असा आव आणत आहेत, जणू ते स्वातंत्र्यवीरच आहेत. मात्र, स्वत:वरील दाखल झालेल्या गुन्ह्यात साक्षीदारांना धमकावण्याचा आणि साक्षी पुराव्यांमध्ये हस्तक्षेप केल्यानं त्यांना पुन्हा एकदा तुरूंगात जायची वेळ आली. राऊत यांनी या पुस्तकाचे सर्व श्रेय पाटकरताईंना द्यायला पाहिजे. या पुस्तकातून टीआरपी मिळण्याचाा आणि स्वत:चे राजकीय नाणे वाजवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राऊत यांच्यासोबत त्या काळात आम्ही होता, आम्ही पण त्यांचे आत्मचरित्र लिहू शकतो. संजय राऊत यांची स्वतःबद्दल बोलून टीआरपी वाढवण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असं त्या म्हणाल्या.
PM मोदींचा विचार पक्का! पाकविरुद्धच्या प्लॅनमध्ये थरूर अन् ओवैसी; पण का? जाणून घ्याच..
जालन्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यासंदर्भात आपण आमदार अर्जुन खोतकर यांच्याशी नक्कीच चर्चा करू, असेही गोऱ्हे म्हणाल्या.
लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देण्याच्या निर्णयावर सरकार लवकरच विचार केरल. कारण, लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली आहे. विरोधी पक्ष सातत्याने खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम करत आहे. महिलांनी विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असंही गोऱ्हे म्हणाल्या.
फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांच्या या पुस्तकावर टोला लगावला. कथा, कादंबऱ्या किंवा बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळं मी असल्या गोष्टी वाचत नाही, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली.