Assembly Election 2024 : उच्च न्यायालयात निवडणूक याचिकांचा ढीग; महाविकास आघाडीकडून सर्वाधिक याचिका
Over 60 pleas filed by mahavikas aghadi candidates challenging Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या ( Assembly Election 2024) निकालाचे कवित्व अद्याप संपलेले नाही. विधानसभा निवडणुकांचा निकाल पराभूत उमेदवारांना अमान्य असल्याने बहुतांश आमदारांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आव्हान देण्यासाठी निवडणूक निकालानंतर 45 दिवसांची मुदत असते. ती मुदत सात जानेवारीला संपुष्टात आली आहे. अखेरच्या आठ दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) निवडणूक याचिका दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. 103 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या 60 हून अधिक याचिका आहे. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अशा एकूण 861 याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंडपीठात दाखल आहेत.
आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी आमची परवानगी घ्या; SC चे BMC ला कठोर निर्देश
निवडणुकीत बनावट मतदान घडवून आणणे, इव्हीएममध्ये छेडछाड करणे, पैसे वाटप करणे, मतदान प्रक्रियेत पारदर्शकता नसणे असा संशय घेऊन पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यात. काँग्रेसच्या विदर्भातील 8 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. संपूर्ण निवडणूक रद्द करून ती नव्याने घेण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हानसुद्धा देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढलेले काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी याचिका दाखल केलीय.
‘मी वेळ वाया घालवत नाही, वो तो चलता रहता…’, मेलोनीसोबतच्या व्हायरल मीम्सवर मोदींचे भाष्य
काँग्रेसच्या 25 जणांकडून याचिका
काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील संग्राम थोपटे, रमेश बागवे, पृथ्वीराज चव्हाण, विदर्भातील गिरीश पांडव, अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील उमेदवार तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, सुभाष धोटे, शेखर शेंडे, संतोषसिंग रावत, सतीश वारजूरकर यांनी दाखल केलीय. उत्तर महाराष्ट्रातील केसी पाडवी, बाळासाहेब थोरात, कुणाल पाटील, प्रवीण चावरे यांनी याचिका दाखल केली आहे. तर मराठवाड्यातील पाच काँग्रेस नेत्यांनी याचिका दाखल केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची याचिका अॅड. असीम सरोदे यांनी दाखल केल्या आहेत. त्यात पुण्यातील हडपसर मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप, सोलापूर शहरचे महेश कोठे, नरेश मनेरा, सुनील भुसारा (विक्रमगड) मनोहर मढवी (ठाणे) यांनी याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांचे दहा दिवसांत सुनावणी होईल, असे अॅड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
काय घेतले आक्षेप ?
मतदार याद्यांमधील गोंधळ, निवडणुकीबाबतची कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार, मते मागण्यासाठी धर्माचा वापर, पैसे वाटप करून मते मागण्याचे व्हिडिओ, इव्हीएम मशिन्सचा गैरवापर याबाबत आक्षेप घेण्यात आलेत.