Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या वेळी फडणवीस उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पत्रकारांनीही त्यांना हाच प्रश्न विचारला यावर फडणवीसांनीही तत्काळ उत्तर पत्रकारांच्या मनातील संभ्रम दूर केला. […]
मुंबई : अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्या ८ जुलैला नाशिकच्या येवला इथून राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी माध्यमांना दिली. (Sharad Pawars state wide tour start from 8 july) https://www.youtube.com/watch?v=T_PO8NAs7kE अजित पवारांनी नऊ […]
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता ठाकरे गटालाही गळती लागलीय. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरेंना जय महारष्ट्र केला होता. तर एकनाथ शिदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभं राहणाऱ्या निलम गोऱ्हे यांनीही साथ सोडून एकनाथ शिंदेंचा हात धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निलम गोऱ्हे यांनी शिवेसेनेत प्रवेश केला […]
Aditya Thackeray attacks on Shinde Group : राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटाला घेरले आहे. जे ओरिजिनल गद्दार आहेत. ज्यांनी मागील वर्षी गद्दारी केली. त्यांना काय किंमत मिळाली हे ज्यांनी (भाजप) त्यांना फोडलं, अमिषं दिली त्यांनीच दाखवून दिलं आहे, […]
Pankaja Munde : मला अनेकदा डावलण्यात आलं पण मी कधीच नाराजी व्यक्त केली नाही. 2019 मध्ये विधानपरिषद निवडणुकांसाठी तयार करा असे मला सांगण्यात आले होते. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दहा मिनिटे आधी थांबण्यास सांगितले गेले, असा गौप्यस्फोट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. मात्र ऐनवेळी निवडणुकीत माघार घेण्यास कुणी सांगितले याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून आरपारच्या लढाईची भाषा बोलली जात आहे. सभा मेळाव्यांतूनही नव्या लढाईचे संकेत दिले जात आहे. खुद्द अजित पवार (Ajit Pawar) यांनीही दोन दिवसांपूर्वी सभेत हा निर्णय का घ्यावा लागला हे सांगितले होते. त्यांनी या सभेत जे काही सांगितले त्याला भाजप […]