Aditya Thackeray on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडापूर्वी काही दिवसा आधी ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी आले होते. तिथे ते येऊन रडले होते, असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. आदित्य ठाकरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देणं मुख्यमंत्र्यांनी टाळून ”ते जाऊदे तो लहान आहे.” अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर आता आदित्य ठाकरेंनी घटनाक्रम सांगितला आहे. […]
Trupti Desai : राज्याचे महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांना गंगा, भागीरथी हे शब्द वापरावेत अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. खरंतर विधवा महिलांचा प्रश्न ज्वलंत आहे, त्यांच्या वाट्याला आधीच भरपूर दुःख आलेलं असतं आणि त्यातच अशा पद्धतीने नद्यांची नावे पाठवणे म्हणजे विधवा महिलांची थट्टा केल्यासारखे आहे. यामुळे त्यांना समाजात ट्रोलसुद्धा केले जाऊ शकते, […]
Nitesh Rane : दिशा सालीयन आणि अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आम्हला वाचवा म्हणून कोणाकोणासमोर रडले आहेत. हे मलाही माहिती आहे. तुम्ही आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा अन्यथा मी लवकरच याचा गौप्यस्फोट करणार आहे, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिला आहे. […]
Supriya Sule on Widhwa women : विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागीरथी’ (Ganga Bhagirathi) असा उल्लेख करण्यावरुन राज्यातील राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) विसंवाद असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हा निर्णय वेदनादायी असल्याचे म्हटले आहे तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) […]
Ajit Pawar यांच्या कथित संभाव्य बंडाविषयी सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारण की विनाकारण हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सोळा आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले तर अजित पवार हे भाजपसोबत जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजित पवार यांनी याचा ठाम शब्दांत इन्कार केलेला नाही. कोणतीही बाब […]
chitra wagh on widowed woman : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विधवा महिलांच्या नावापुढे गंगा भागीरथी (Ganga Bhagirathi) असा उल्लेख करण्यावरुन राजकारण तापले आहे. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे गंगा भागिरथी असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना विभागाच्या सचिवांना दिल्या होत्या. […]