नागपूर : ग्रामीण भागातील घरकुलांसाठी आमदार बच्चु कडूंनी आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधले शहरी व ग्रामीण घरकुलांसाठी समान निकष असावेत अशी मागणी करत त्यांनी तंबूमध्ये बसून हे आंदोलन केले. यावेळी ते पालामध्ये राहिले. त्यामुळे आज ते शहरी व ग्रामीण घरकुल तफावती करीता पालघरात राहून हिवाळी अधिवेशनात हजेरी लावणार. त्यांचे आंदोलनाच्या ठिकाणचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल […]
नागपूरः वेगवेगळ्या प्रश्नावरून विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या घोषणा देण्यात येत आहेत. भूखंड, श्रीखंड, खोके सरकार अशा घोषणा देण्यात येत होत्या. आज विधिमंडळाच्या पायरीवर महाविकास आघाडीतील आमदार हे हातात नागपूरची संत्री घेऊन आले होते. त्यांनी नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री, अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा, अशा घोषणा दिल्या […]
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफाळून आला आहे. त्यामुळे अनेक मुद्द्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मंत्री दावे-प्रतिदावे करत आहेत. काल महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या आक्रमकपणा विरोधात विधानसभेत ठराव समंत केला. ठरावानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे यांच्या याच मागणीविरोधात कर्नाटक सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी : काही दिवसापासून विशेषतः शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्या दिवसांपासून सरकारमध्ये शिंदे गट विरोधकांच्या आणि लोकांच्या टीकेला बळी पडले आहे. शिंदे गटाची नक्की हे प्रकरणं येताहेत कुठून? त्याचा शिंदेंसोबत संबंध जोडला कसा जातोय? त्याचा शिंदेच्या प्रतिमेवर काय परिणाम होणार याचा आढावा घेऊया. गेल्या काही दिवसात शिंदे सरकारच्या बदनामीचे एक-एक किस्से समोर […]
अहमदनगर : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. शिंदे म्हणाले, भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांची भेट घेऊन मनसे प्रमुख राज […]
पुणे : भाजपच्या दिवंगत नेत्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतच कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांचा निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणुकीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी कसब्यातून पोटनिवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एखाद्या राजकीय […]