पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) नुकतेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह असे दोन्हीही एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सध्या टोकाला गेला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये सध्या प्रचंड घमासान सुरु आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच आयोगाने निर्णय घेतला आहे. […]
निवडणूक आयोगाच्या निकालांनंतर उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीनेही उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकर आज अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मनोमिलन कायम राहिले, तर आम्ही एकटे लढण्यास मोकळे आहोत.” यावेळी प्रकाश आंबडेकर म्हणाले की, “राज्यातील […]
मुंबई : राज्याच्या राजकारणातील नेते मंडळी एकमेकांचे आलेले अनुभव मुलाखतीतून सांगत असतात. असाच एक स्वराज्य संघटनेचे प्रमुख अनुभव संभाजीराजे छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल सांगितला आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत कितीही चांगले संबंध असतील, पण ते माझ्या पाठीमागे काय करत असतील मला माहित नसल्याचं संभाजीराजेंनी एका मुलाखतीद्वारे सांगितलंय. संभाजीराजे म्हणाले, […]
अशोक परुडे राज्यात शिंदे गट व भाजपमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसून येत असले तरी उस्मानाबादमध्ये मात्र भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil), शिंदे गटाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यात मात्र आता बिनसलं आहे. दोघेही एकमेंकाना आता डिवचू लागले आहेत. राणा जगजीतसिंह पाटील, त्यांचे वडील पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व जिल्ह्यात राहिले आहे. त्यात शिवसेनेने […]
कोल्हापूरचे ( Kolhapur ) संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी आपल्या स्वराज्य संघटनेच्या ( Swarajya Sanghtana ) पदाधिकाऱ्यांच्या नावाची एक जाहीर पोस्ट लिहली आहे. संभाजीराजे यांनी या माध्यमातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली असल्याचे दिसते आहे. त्यांच्या या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये 14 प्रमुख पदाधिकारी व 60 राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी […]
पुणे : मागील दोन दिवसांत राज्यात महाशिवरात्र, शिवजयंती, गृहमंत्री अमित शहांचा दौरा, शिवसृष्टीचे लोकार्पण, ‘मोदी अॅट 20’ पुस्तक प्रकाशन अशा अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) रात्रीनंतर कमालीचे अॅक्टिव्ह दिसले. कार्यक्रम सकाळी असो दुपारी की संध्याकाळी या प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री हजर होतेच. कधी पुण्यात तर कधी कोल्हापूर तर कधी थेट उत्तर […]