आंबेडकरांकडून भाजपला नागाची तर, काँग्रेसला सापाची उपमा; म्हणाले, उत्तर देऊन थकलो
Prakash Ambedkar Criticize Congress and BJP : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांच्यावर नेहमीच कॉंग्रेस (Congress) आणि महविकास आघाडीकडून भाजपची (BJP) बी टीम असल्याचा आरोप केला जातो. त्यावरून आंबेडकर यांनी ट्विट करत भाजपला नागाची तर, काँग्रेसला सापाची उपमा देत टीका केली आहे.
सहा महिन्यांपासून ‘प्लॅनिंग’ : प्रॉपर्टीसाठी सुनेनं काढला सासऱ्याचा काटा; पॉलिटिकल कनेक्शनचाही संशय
दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वंचितने बहुतांश मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बाजी मारली नाही. आणि यावेळेस अॅड. प्रकाश आंबेडकरांना मतदारांनी नाकारले.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
या ट्विटमध्ये आंबेडकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कॉंग्रेस समर्थकांकडून माझ्यावर आणि वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. मी भाजपची बी टीम आहे का? या एकाच प्रश्नाचं उत्तर नेहमी देऊन मी थकलो आहे. ज्या प्रमाणे मुस्लिमांना विचारलं जात की, तुम्ही दहशतवादा विरोधात आहात का? भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांत कोणाचं समर्थन करता? तसंच मलाही विचारलं जात.
आये दिन सोशल मीडिया पर Congress समर्थकों द्वारा मुझ पर और VBA पर BJP की B-टीम होने का आरोप लगाए जाते हैं।
क्या मैं BJP की B-टीम हूं? — मैं बार-बार एक ही सवाल का जवाब देते-देते थक गया हूं।
ये जातिवादी आरोप हर भारतीय मुसलमान से पूछे जाने वाले सवाल से बहुत मिलता-जुलता है — क्या… pic.twitter.com/RkFYp4s3rB
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 13, 2024
जे माझ्यावर वंचित भाजपची बी टीम असल्याचे आरोप करणाऱ्यांचं म्हणण आहे की, मी निवडणूक लढतो म्हणून मी भाजपची बी टीम आहे. पण मी निवडणूक का लढू नये. भारतात काय द्विपक्ष पद्धती आहे का? जर कॉंग्रेस समर्थकांना तस वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या जातिवादी आणि हुकुमशाह नेत्यांना सांगून लोकप्रतिनिधी कायदा, 1950 बदलावा.
Gold Scheme Case: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडचणीत, न्यायालयाने चौकशीचे आदेश
तसेच मी कॉंग्रेसवर टीका करतो. पण मी भाजपवर जास्त टीका करतो. जर मी भाजपची बी टीम असतो. तर माझ्याकडे पैसा असला असता. मी पुण्यात एका साध्या टू बीएचके फ्लॅटमध्ये राहत नसलो असतो. माझी आणि वंचितची संपत्ती मी जाहीर केलेली आहे. तसेच मी भाजपचे अनेत प्रस्ताव फेटाळले आहेत. त्यामुळे जे माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांनी मुंबईतील माझ्या कार्यालयात यावं. जे तुमच्या भव्य कार्यालयाच्या बाथरूमपेक्षाही लहान आहे.
अहमदनगरचे खासदार कुख्यात गुंडाच्या घरी; गजा मारणेकडून सत्कार, लंके वादात भोवऱ्यात
आमचा पक्ष सामान्य लोकांच्या देणग्यांवर चालतो. फुले-शाहू आंबेडकर आमच्या मनात आणि डोक्यात आहेत. मात्र कॉंग्रेसला मला पुढे जाऊ द्यायचे नाही. त्यांना आंबेडकरी विचार पुढे जावा असं वाटत नाहीय. त्यांना बाबासाहेबांनाही दोनदा हरवलं आहे. तसेच मी कधीही भाजपसोबत जाणार नाही. तसेच बहुजनांना हे समजने गरजेचे आहे की, भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फरक एवढाच आहे की, भाजप त्यांचा अजेंडा जाहीर करतं आणि कॉंग्रेस करत नाही. बहुजनांना आपल्या जाळ्यात ओढते. भाजप नाग आहे. तर कॉंग्रेस साप आहे.
संविधान वाचवण्यासाठी आम्ही पुढे आलो होतो. कॉंग्रेस नाही. माझे आजोबा देशाच्या लोकशाहीच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांनी लोकशाही आणि मुलभूत सिद्धांतांची पायाभरणी केली. मी देखील त्याच विचारधारेचा आहे. त्यामुळे आम्ही परत येऊ. असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस आणि भाजप दोन्हीवर देखील निशाणा साधला आहे.